आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan Firing Continue At India's Boarder, Modi Said To Army Be Ready

सीमेवर पाकिस्तानचा गोळीबार सुरू, नरेंद्र मोदींचे लष्‍कराला सज्ज राहण्‍याचे आदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र : पाकच्या गोळीबारात जखमी झालेला मुलगा.
जम्मू / नवी दिल्ली - जम्मू-काश्मीर सीमेवर पाकिस्तानचा गोळीबार सुरू असतानाच भारताने बुधवारी तडाखेबंद प्रत्युत्तर देतानाच आपली भूमिका आणखी कणखर केली आहे. लष्कर व हवाई दल प्रमुखांनी परिस्थिती गंभीर असल्याचे सांगून सडेतोड प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लष्कराला सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.

हवाई दल प्रमुख अरूप राहा म्हणाले, आम्हाला युद्ध नको आहे, पण उत्तर देण्यास तयार आहोत. पाकला चोख प्रत्युत्तर दिले जात असल्याचे लष्करप्रमुख सुहाग म्हणाले. पाकिस्तानने चिथावणीखोर कृती केल्यास सडेतोड उत्तर देऊ, असे भारताने संयुक्त राष्ट्रांना सांगितले आहे.

सरकारची कारवाई
१. संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी तिन्ही लष्करप्रमुखांची बैठक घेतली. कारवाईची पूर्ण मुभा.
२. गृहमंत्र्यांनी दोनदा बीएसएफच्या महासंचालकांशी चर्चा केली. चोख प्रत्युत्तर देण्याचे निर्देश.
३. पंतप्रधानांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभालांवर निर्णयाची जबाबदारी सोपवली.
४. भारताचा पाकशी फ्लॅग मीटिंगला नकार. आता पाकलाच पुढाकार घ्यावा लागेल.

पाकला त्यांच्याच भाषेत उत्तर द्या
मोदी यांनी सायंकाळी लष्करप्रमुख तसेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांच्यासोबत बैठक घेतली. गोळीबाराची सुरुवात पाकने केली आहे, आता पाकिस्तानेच तो बंद करावा. पाकला त्याच्याच भाषेत उत्तर देण्यात यावे, असे लष्कराला सांगितले.

पाकचे नुकसान
* भारताचा पाकच्या ५० पेक्षा जास्त चौक्यांवर गोळीबार.
* पाकिस्तानचे १५ पेक्षा जास्त नागरिक ठार, ३५ जखमी.
* पाकिस्तानी रेंजर्सशिवाय तेथील लष्करही सक्रिय.
* गोळीबाराच्या बातम्या दाखवू नका, पाक लष्कराचे देशातील न्यूज चॅनेलना आवाहन.
* पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी राष्ट्रीय सुरक्षा समितीची
बैठक बोलावली.