आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan Flag Hoisted On CM Muftis Ancestral House In Bijbehara

जम्मू-काश्मीर: मुख्यमंत्र्यांच्या वडिलोपार्जित घरावर फडकतोय पाकिस्तानचा राष्ट्रध्वज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर- जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या वडिलोपार्जित घरावर पाकिस्तानचा राष्ट्रध्वज फडकत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दक्षिण काश्मीरमधील बिजबेहारा भागातील एका घरावर पाकिस्तानचा राष्ट्रध्वज फडकत आहे. उल्लेखनिय म्हणजे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांचे ते वडिलोपार्जित घर असल्याचा दावा एका वृत्तवाहिनीने केला आहे.

दुसरीकडे, मुफ्ती यांच्या घराचे छायाचित्र सोशल साइटवर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहे.

दरम्यान, सोमवारी लष्कराच्या एन्काउंटरमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्‍यात आला. मंगळवारी तिन्ही दहशतवाद्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यात शेकडो काश्मीरी लोक सहभागी झाले होते. यावेळी बहुतेक घरांवर पाकिस्तानचा राष्ट्रध्वज फडकत असल्याचे स्थानिक मीडियाने म्हटले आहे. दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेवर दगडफेक झाल्याची माहिती देखील समोर आली होती.

जम्मू-काश्मीरमध्ये यापूर्वी फडकले होता पा‍किस्तानचा राष्‍ट्रध्वज...
>17 जुलै: श्रीनगरमधील नोहट्टा भागात एका मशिदीत नमाजनंतर आंदोलकांनी दहशतवादी संघटना ISIS व लश्कर-ए-तोयबाचे झेंड दाखवले होते.
>24 जुलै: श्रीनगरमधील जामिया मशिदीत नमाज अदा केल्यानंतर लोक ISIS चा झेंडा घेवून बाहेर पडले होते. सगळ्यानी काळ्या कापडाने चेहरा झाकला होता.
>31 जुलै: श्रीनगरमधील जामिया मशिदीत ISIS व लश्कर-ए-तोयबाचे झंडे दाखवले होते. त्यावर ‘IS JK जल्द आ रहा है' असा संदेश लिहिला होता.
>14 ऑगस्ट: पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनी जम्‍मू-काश्‍मीरची राजधानी श्रीनगरमध्ये ठिकठिकाणी पाकिस्तानचा राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. अलगाववादी संघठना दुख्तरान-ए-मिल्लतच्या प्रमुख आसिया अंद्राबीने तर खुलेआम पाकिस्तानी झेंडा हातात घेवून भाषण ठोकले होते.
>21 ऑगस्ट: श्रीनगरमध्ये ISIS च्ये झेंड्यावर बगदादीचे छायाचित्र दिसले होते.
>28 ऑगस्ट : श्रीनगरमधील एका मशिदीजवळ ISIS चे झेंडे दिसले होते. त्यावर 'WE Are JKIS' असा संदेश लिहिण्यात आला होता.
>13 सप्टेंबर: श्रीनगरमध्ये एक मॅरेथॉनमध्ये पाकिस्तानचा राष्ट्रध्वज दाखवण्यात आला होता. तसेच आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेकही केली होती.
>25 सप्टेंबर: श्रीनगरमध्ये बकरी ईदच्या नमाजनंतर आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली होती. त्यानंतर PAK-ISIS चे झेंडे दाखवले होते.