आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PAK सरकारच्या वेबसाइटवर तिरंग्यासह राष्ट्रगीतही; भारताला दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामबाद / नवी दिल्ली- एका अज्ञात हॅकरने पाकिस्तान सरकारचे संकेतस्थळ हॅक केल्याची घटना उजेडात आली आहे. त्यावर भारताचे राष्ट्रगीत पोस्ट करून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छाही दिल्या.   

pakistan.gov.pk हे संकेतस्थळ दुपारी तीनच्या सुमारास हॅक झाले. त्यावर हॅकरने ‘एनईआेएचफोरसीकेथ्रीआर’ असा संदेश लिहून पाकिस्तान सरकारला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. हॅकरने अशोक चक्रासह तिरंगा पोस्ट करून त्यावर स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा लिहिल्या. पंधरा ऑगस्टनिमित्त शुभेच्छा असे लिहिण्यात आले होते. शब्दांवर विश्वास, मनात स्वातंत्र्याची आस आणि आत्मिक अभिमान..हे सर्व मिळवून देणाऱ्या सर्व महान लोकांना आपण वंदन करूया, अशा आशयाच्या आेळीही त्यावर देण्यात आल्या होत्या.  
 
त्यानंतर ‘जन गण मन..’ हे राष्ट्रगीत देण्यात आले होते. संकेतस्थळ हॅक झाल्याच्या वृत्ताला पाकिस्तानच्या परराष्ट्र विभागाकडून मात्र दुजोरा मिळू शकला नाही. पाकिस्तानच्या दिल्लीतील उच्चायुक्त कार्यालयातूनदेखील त्यावर काही भाष्य करण्यात आले नाही.  
 
अब्बासींकडे १० महिन्यांसाठी सूत्रे  :  हंगामी पंतप्रधान शाहिद अब्बासी यांच्याकडे दहा महिने पाकिस्तानची सूत्रे असतील, असे संकेत पीएमएल-एन पक्षाकडून देण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने अपात्र ठरवल्यानंतर अब्बासी यांच्याकडे ४५ दिवसांसाठी सूत्रे सोपवण्यात आली होती. परंतु माजी पंतप्रधान शरीफ यांनी गुरुवारी तातडीने बैठक बोलावली होती. त्यात अगोदरच्या निर्णयाचा आढावा घेण्यात आला. शरीफ यांचे बंधू शहाबाज यांना खासदारकीच्या निवडणुकीनंतर केंद्रात आणण्याचा घाट होता. परंतु पंजाबचे कायदा मंत्री राणा सनुल्ला यांनी अननुभवी शहाबाज यांच्याकडे सूत्रे सोपवणे शहाणपणाचे ठरणार नाही, असे म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर अब्बासींचा कालावधी वाढवण्याचा विचार-विनिमय सुरू होता. 
बातम्या आणखी आहेत...