आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकने या वर्षात 724 वेळा केले शस्त्रसंधीचे उल्लंघन; गेल्या आठ वर्षांतील सर्वाधिक घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- पाकिस्तानने या वर्षी जम्मू आणि काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर ७२४ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. गेल्या आठ वर्षांतील या सर्वाधिक घटना आहेत.  


केंद्रीय गृह मंत्रालयाने संकलित केलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी लष्कराने या वर्षी ऑक्टोबरपर्यंत आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर ७२४ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. २०१६ मध्ये या कालावधीत शस्त्रसंधी उल्लंघनाच्या ४४९ घटना घडल्या होत्या. पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात या वर्षी ऑक्टोबरपर्यंत १२ नागरिक आणि सुरक्षा दलांचे १७ जवान ठार झाले आहेत. एकूण ७९ नागरिक आणि सुरक्षा दलांचे ६७ जवान जखमी झाले आहेत, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.  


भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आंतरराष्ट्रीय सीमा तसेच जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषा आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर नोव्हेंबर २००३ पासून शस्त्रसंधी अस्तित्वात आली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीमेची लांबी ३,३२३ किमी असून त्यापैकी २२१ किमी लांबीची आंतरराष्ट्रीय सीमा आणि ७४० किमीची नियंत्रण रेषा जम्मू-काश्मीरमध्ये येते.  
२०१६ या वर्षात शस्त्रसंधी उल्लंघनाच्या ४४९ घटना घडल्या होत्या. त्यात १३ नागरिक आणि १३ जवान ठार, तर ८३ नागरिक आणि ९९ जवान जखमी झाले होते. २०१४ मध्ये शस्त्रसंधी उल्लंघनाच्या ५८३ घटना घडल्या होत्या. त्यात १४ नागरिक आणि सुरक्षा दलांचे ३ जवान ठार झाले होते, तर १०१ नागरिक आणि सुरक्षा दलांचे २८ जवान जखमी झाले होते.  

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, गेल्या ८ वर्षांत घडलेल्या घटना...

बातम्या आणखी आहेत...