आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Pakistan High Commission Official Detained By Delhi Police In A Case Of Espionage

दीड वर्षापासून हेरगिरी; पाक उच्चायुक्तालयातील आयएसआय हेर अटकेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाक उच्यायुक्तालयातील हाच तो अधिकारी ज्याने आयएसआयला गुप्त माहिती पाठविली. - Divya Marathi
पाक उच्यायुक्तालयातील हाच तो अधिकारी ज्याने आयएसआयला गुप्त माहिती पाठविली.
नवी दिल्ली- पाकिस्तानी उच्चायुक्तालयात राहून हेरगिरी करणाऱ्या आयएसआयच्या एका हेरास दिल्ली गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बुधवारी अटक केली. त्याच्यासाेबत दोन भारतीय हेरांनाही अटक करण्यात आली आहे. महमूद अख्तर असे या पाकिस्तानी गुप्तहेराचे नाव असून राजकीय सुरक्षेच्या नियमान्वये त्याला अटक करून चौकशीनंतर सोडून देण्यात आले. मात्र, केंद्र सरकारने त्याला ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश दिले आहेत.

हा प्रकार उघडकीस येताच परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी पाकिस्तानी उच्चायुक्त अब्दुल बासित यांना पाचारण करून अख्तरचा कारनामा कानी घातला. अख्तरसोबत अटक करण्यात आलेले दोघे जण राजस्थानातील नागोर येथील आहेत. मौलाना रमजान आणि सुभाष जांगिड अशी त्यांची नावे आहेत. जोधपूरमधील शोएब याच्यावरही अख्तरला हेरगिरीच्या कामी मदत केल्याचा आरोप आहे. त्याचा शोध पोलिस घेत आहेत.

पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकारी महमूद अख्तर दीड वर्षापासून हेरगिरी करत होता. त्याच्यावर सहा महिन्यांपासून पाळत होती. गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीच्या आधारे बुधवारी त्याला अटक करण्यात आली. दिल्लीतील एका प्राणिसंग्रहालयानजीक दोन भारतीयांकडून संवेदनशील माहिती खरेदी करताना त्याला पकडण्यात आले. अख्तर हा अशी हेरगिरी करणाऱ्या टोळीचा म्होरक्या होता. प्रारंभी त्याने भारतीय नागरिक असल्याचे सांगितले होते. चांदणी चौक परिसरातील रहिवासी असल्याचे सांगून त्याने महबूब राजपूत नावाने बनावट आधार कार्डही त्याने दाखवले. कसून चौकशी केल्यावर त्याने खरी ओळख सांगितली. पाक उच्चायुक्तालयाचा कर्मचारी असल्याने त्याला राजकीय संरक्षण आहे. त्यामुळे त्याला पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या ताब्यात देण्यात आले.

व्हिसा विभागात अडीच वर्षांपासून आयएसआय एजंट
अख्तरपाकिस्तानी उच्चायुक्तालयात अडीच वर्षांपासून व्हिसा विभागात कार्यरत होता. पाकमधील रावळपिंडी जिल्ह्यात कहुटा गावचा हा रहिवासी ४० बलूच रेजिमेंटमध्ये हवालदार पदावर आहे. पाक गुप्तहेर संस्था आयएसआयमध्ये तो जानेवारी २०१३ पासून प्रतिनियुक्तीवर आहे.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...