आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- लाहोर तुरुंगात कैद्यांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यानंतर तीव्र कोमात असलेला भारतीय कैदी सरबजितसिंग याला मानवतेच्या दृष्टिकोनातून तत्काळ मुक्त करावे, ही भारताची मागणी पाकने फेटाळली आहे. त्याच्यावर योग्य उपचार सुरू असून परदेशात नेण्याची गरज नसल्याचे पाकचे म्हणणे आहे.
परदेशात उपचारांबाबत निर्णय घेण्यासाठी पाकने स्थापन केलेल्या चार डॉक्टरांच्या समितीने सोमवारी उपचारांची सखोल माहिती घेतल्यानंतर सरबजितवर पाकमध्येच उपचार योग्य असल्याचे स्पष्ट केले.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पाकला लिहिलेल्या पत्रात सरबजितच्या सुटकेचे आवाहन करून पाक तुरुंगातील भारतीय कैद्यांची काळजी घेण्याची गरज प्रतिपादित केली आहे. हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणीही पत्रात आहे. दरम्यान, यासाठी राजकीय पातळीवर पाकशी चर्चा सुरू असल्याचे केंद्रीय गृहराज्य मंत्री आर. पी. एन. सिंह यांनी सोमवारी स्पष्ट केले.
अजूनही कोमातच..
सोमवारी सरबजितच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झालेली नाही. तो कोमात असून व्हेंटिलेटरवर आहे. त्याच्या प्रकृतीविषयी पाक सरकारने अजूनही अधिकृतरीत्या माहिती दिलेली नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.