आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकिस्तान जगातील चौथा असुरक्षित देश, मिळाले फक्त 3 गुण; भारत 13 व्या क्रमांकावर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पाकिस्तान जगातील चौथा सर्वात धोकादायक आणि असुरक्षित देश असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. वर्ल्ड इकोनॉमिक फोरमची शाखा 'ग्लोबल ट्रॅव्हल अॅण्‍ड टूरिझम'ने जगातील सुरक्षित आणि असुुरक्षित देशांची यादी जाहीर केली आहे. या यादीत भारत 13 व्या क्रमांकावर आहे. उल्लेखनिय म्हणजे भारत असुरक्षित देशांच्या यादीत आहे, परंतु पहिल्या 10 मध्ये नाही.

सुरक्षित देशांच्या यादीत फिनलंड अव्वल स्थानी आहे. सुरक्षा आणि संरक्षणात पाकिस्तानला केवळ 3.04 गुण मिळाले, तर फिनलंडला 6.7 गुण मिळाले.

सर्वात सुरक्षित आणि संरक्षक देश कोणते?

सर्वात सुरक्षित देश. कंसात रेटींग
1. फिनलंड : 6.7
2. कतर : 6.61
3. यूएई : 6.6
4. आईसलंड : 6.5
5. ऑस्ट्रिया : 6.47
6. लक्झमबर्ग : 6.46
7. न्यूझीलंड : 6.41
8. सिंगापूर : 6.4
9. ओमान : 6.38
10. पुर्तगाल : 6.33

हे आहेत सर्वात असुरक्षित देश....
1 . नायझेरिया
2. कोलंबिया
3. यमन
4. पाकिस्तान
5. व्हेनेज्युएला
6. इजिप्ट
7. ग्वाटेमाला
8. अल- साल्वाडोर
9. होंडुरास
10. थायलंड
11. केनिया
12. लेबनॉन
13. भारत
14. फिलीपाईन्स
15. जमैका
बातम्या आणखी आहेत...