आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुण्याही देशात सर्जिकल स्ट्राइकची लष्कराला मुभा, डोभाल करणार ब्ल्यूप्रिंट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो  -  भारतीय लष्कर - Divya Marathi
फाइल फोटो - भारतीय लष्कर
नवी दिल्ली - म्यानमारप्रमाणेच कोणत्याही देशात घुसून लष्कर अतिरेक्यांचा सफाया करू शकेल. सरकारने गुरुवारी लष्कराला तशी मोकळीकच दिली. गृह मंत्रालयात झालेल्या बैठकीस गृहमंत्री, संरक्षणमंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, गुप्तचर यंत्रणा प्रमुख लष्कराचे बडे अधिकारी हजर होते.
कोणत्याही देशाच्या हद्दीत लपून बसले असले तरी अतिरेक्यांविरुद्ध तडाखेबंद कारवाई करण्याचे बैठकीत ठरले. हल्ल्यानंतर अितरेकी दुसऱ्या एखाद्या देशात आश्रयाला पळून गेले, तर त्या देशात घुसून आॅपरेशन केले जाईल, असे सूत्रांनी सांगितले.
सर्वाधिक अतिरेकी पाकव्याप्त काश्मिरात दडलेले आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना सर्जिकल आॅपरेशनची ब्ल्यूप्रिंट करण्यास सांगण्यात आले. प्रक्रियेत पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षणमंत्री, एनएसए, गृह संरक्षण सचिव, गुप्तचर प्रमुख, लष्कर, हवाई दल प्रमुख सहभागी असतील. बैठकीनंतर डोभाल म्यानमारला गेले.
भास्कर एक्स्पर्ट
कारवाईने चीनच्या चालींना धक्का
जी. पार्थसारथी (परराष्ट्र व्यवहार विषयातील तज्ज्ञ)
म्यानमारमधील भारताच्या कारवाईला मोठे महत्त्व आहे. हा फक्त अतिरेक्यांचा बदला घेण्याचा प्रश्न नव्हता, तर पूर्वेकडे चीनच्या महत्त्वाकांक्षेला लगाम घालणे हा होता. भारताला यात दुहेरी यश मिळाले. चीन तर सावध झालाच, शिवाय पाकिस्तानही टरकला. पूर्वेकडे दहशतवाद फैलावणारे बोडो, परेश बरुआचा उल्फा, मणिपूरचे अतिरेकी आणि खापलांग गटाने एकजूट होऊन नवीन संघटना तयार केली आहे. चीनने त्यासाठी त्यांना मदत केली आहे. फ्रीडम फॉर साऊथ-वेस्टर्न, साऊथ-ईस्ट आशिया या नावाच्या या संघटनेने फक्त मणिपूर, आसामच नव्हे तर म्यानमारमध्येही दहशतवाद पसरवला आहे. चीनच्या चिथावणीमुळेच या नव्या संघटनेने म्यानमारमधील कचिन आणि शान या अल्पसंख्याक प्रांतात शस्त्रसज्ज बंडखोरी सुरू केली आहे. सध्या म्यानमारचे चीनसोबतचे संबंध बिघडलेले आहेत. त्यांनी अनेक चिनी प्रकल्प रोखले आहेत. दुसरीकडे हा देश भारताच्या जास्त जवळ आला आहे.म्यानमारशी आमची १६४० किमीची सीमा अरुणाचल, मणिपूर, नागालँड आणि मिझोराम या चार प्रातांना लागून आहे. म्यानमारचा कचिन प्रांत तर अरुणाचलला लागूनच आहे. म्यानमारची घटना स्वीकारावी, यासाठी तेथील अल्पसंख्याक बंडखोरांना राजी करण्याचा प्रयत्न भारत करत आहे. बंडखोरी सोडून नेते झालेले मिझोरामचे माजी मुख्यमंत्री जोरमान थांगा ही मोहीम चालवत आहेत. चीनची घाबरगुंडी उडण्याचे हेच कारण आहे. भारताला या मिशनमध्ये यश मिळाले तर आपल्याला दबाव कायम ठेवणे कठीण होईल, असे चीनला वाटते. अलीकडे मणिपूरमध्ये लष्करावरील हल्ला हा या तिळपापड होण्याचा परिणाम आहे. भारत एवढे कडक पाऊल उचलेल, असे चीनला वाटले नव्हते. भविष्यात या भागात अशा आणखी कारवाया होऊ शकतात. दोन्ही बाजूंनी. भारताकडूनही आणि अतिरेक्यांकडूनही. पाकिस्तानचा तिळपापड भारताच्या कारवाईमुळे झाला नाही, तो झाला बांगलादेशने भारताची बाजू घेतल्याने. चीन-पाकची रणनीती येथेच अपयशी ठरत आहे. भारताने अलीकडेच पाकशी बांगलादेशची मैत्री कमजोर केली, तर दुसरीकडे म्यानमारला चीनपासून दूर केले. हा मोठा कूटनीतिक विजय आहे.

मंत्र्यांची वक्तव्ये : भारतालाहवे होते की सांगितल्याविना पाकने जगाला सांगावे की पुढील लक्ष्य तेच आहेत. यामुळे दोन दिवसांत संरक्षणमंत्र्यांसह चार मंत्र्यांनी आक्रमक विधाने केली.
पाक यात अडकला का ? : होय.तेथील संरक्षणमंत्र्यांसह गृहमंत्री, लष्करप्रमुख, माजी लष्करप्रमुख, विरोधी पक्षनेते आणि संसदेपर्यंत सर्वांनी मान्य केले की पुढील लक्ष्य तेच आहेत.

दोन दिवसांच्या वक्तव्यांचा अर्थ काय?
{अतिरेकी लष्करासह रहिवासी भागांतील लोकांवर हल्ला करू शकतात.
{अतिरेकीसंघटनेचा प्रमुख एस. खापलांग हा म्यानमारमधील रहिवासी भागात लपण्याच्या तयारीत आहे.

४० अतिरेक्यांचा गट ईशान्येत घुसला
म्यानमार लष्करी कारवाईच्या सूडासाठी ईशान्येकडील राज्यांत ४० अतिरेकी घुसले. नागालँड, अरुणाचल, मणिपूर, हाय अलर्टवर.

अामचे अणुबॉम्ब शब-ए-बारातसाठी नाहीत : मुशर्रफ
शब-ए-बारातसाठीआम्ही अणुबॉम्ब बनवले नाहीत. भारताचा अजेंडा पाकिस्तानला दाबण्याचा आहे. मोदी आशियात दादागिरी करत आहेत.

घाबरलेले लोक प्रतिक्रिया देऊ लागले आहेत : पर्रीकर
विचारकरण्याच्या पद्धतीत बदल झाल्यास चित्रही बदलू लागते. भारताच्या नव्या पवित्र्याने घाबरलेले लोक आता प्रतिक्रियाही देऊ लागले आहेत.