आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan PM Nawaz Sharif At Narendra Modi Oath Ceremony News In Marathi

पाक पंतप्रधान नवाझ शरीफ नरेंद्र मोदींच्या शपथविधी समारंंभासाठी भारतात येणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद- पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ भारताचे नियोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी समारंभाला उपस्थित राहण्यासाठी भारतात येणार असल्याचे पाकिस्तान मुस्लिम लीगच्या प्रवक्त्याने सांगितले आहे.
यासंदर्भात या पक्षाचे नेते शीरी रहमान म्हणाले, की भारत आणि पाकिस्तानला चर्चा करावी लागेल आणि प्रत्येक मुद्द्यावर करावी लागेल. शपथविधीनंतर लगेच ठोस मुद्द्यांवर चर्चा करता येणार नाही याची आम्हाला कल्पना आहे. परंतु, सुरवातीची चर्चा तर यावेळी होऊ शकते.

नरेंद्र मोदी यांचा शपथविधी 26 मे रोजी राष्ट्रपती भवनातील मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. या समारंभासाठी जगभरातील नेत्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलविण्यात आले आहे. इतर नेत्यांप्रमाणे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनाही निमंत्रण पाठविण्यात आले होते.
परंतु, एवढ्या कमी वेळेत एखाद्या देशाच्या प्रमुखाने दुसऱ्या देशातील समारंभाला जाण्याचा लगेच निर्णय घेणे काही शक्य नव्हते. शिवाय पाकिस्तानच्या लष्कराने पाक पंतप्रधानांनी मोदींच्या शपथविधीला जाऊ नये असा पवित्रा घेतला आहे, अशा स्वरुपाच्या बातम्या माध्यमांमध्ये झळकल्या होत्या. त्यामुळे नवाझ शरीफ यांच्या भारत दौऱ्यावर प्रश्नचिन्ह लागले होते.
अखेर लष्करी दवाबाला बळी न पडता नवाझ शरीफ यांनी भारतात येण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार असताना नवाझ शरीफ भारतात आले होते. तेव्हा उभय देशांमध्ये वादग्रस्त मुद्दे वगळता इतर विषयांवर चर्चा झाली होती. नरेंद्र मोदी यांचा हा शपथविधी समारंभ असल्याने यावेळी अशा स्वरूपाची चर्चा होण्याची शक्यता कमीच आहे. शिवाय आता नवाझ शरीफ भारतात आल्याने नरेंद्र मोदी यांनाही पाकिस्तानात जाणे अपरिहार्य ठरणार आहे. या भेटीमुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिक मजबूत होण्यास मदत होणार असल्याचे दिसून येते.
ट्विटरवर उमटल्या प्रतिक्रिया... वाचा पुढील स्लाईडवर