आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan PM Nawaz Sharif India Tour, News In Marathi

शरीफ यांचा दौरा: हुरळू नका, काँग्रेसचा सल्ला, एमडीएमके दाखवणार काळे झेंडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी भारताच्या दौर्‍यास हिरवा कंदील दाखवल्याने नवनिर्वाचित सत्ताधारी भाजप खुश झाला आहे तर काँग्रेसने सावध भूमिका घेतली असून शरीफ यांच्या दौर्‍याने हुरळून न जाता 26- 11 मुंबई हल्ला, सीमापार दहशतवाद आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमबद्दल पाकिस्तानला जाब विचारा, असा सल्ला भाजपला दिला आहे.
पाकिस्तानी पंतप्रधानांनी मोदींच्या शपथविधी सोहळ्यास हजेरी लावण्याची तयारी दर्शवल्याची बातमी आनंददायक आहे. ही नव्या नात्याची सुरुवात आहे. पाकिस्तान, चीन, भूतान, श्रीलंका, म्यानमार हे आपले शेजारी आहेत आणि आपण शेजारी बदलू शकत नाही, अशा शब्दांत भाजपचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. विरोधी पक्ष काँग्रेसने हुरळलेल्या भाजपला सावधगिरीचा सल्ला दिला आहे. दहशतवाद आणि चर्चा एकाच वेळी होऊ शकत नाही, अशी भूमिका भाजपने सातत्याने घेतली आहे. आता सत्तेवर आल्यानंतर भाजप 26-11 हल्ल्याची संथ सुनावणी, हाफिज सईद, दाऊद इब्राहिम आदी मुद्द्यांवर भाजप पाकिस्तानला जाब विचारेल, अशी आशा काँग्रेस प्रवक्ते मनीष तिवारी यांनी व्यक्त केली.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, शरीफ यांच्या दौर्‍यामुळे शिवसेनेची गोची