आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan Readies India Terror Dossier For NSAs Meet Next Month

NSA ची भेट : भारतीय दहशतवादाशी संबंधित कागदपत्रे जमवण्यात पाक व्यस्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो। - Divya Marathi
फाइल फोटो।
नवी दिल्ली - पुढील महिन्यात भारत आणि पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांमध्ये होणाऱ्या बैठकीसाठी पाकिस्तानने तयारी सुरू केली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तान बलुचिस्तान आणि कराचीमध्ये दहशतवादाला पाठिंबा देण्यात भारताच्या भूमिकेबाबत एक रिपोर्ट तयार करत आहे.
एका पाकिस्तानी अधिकाऱ्याच्या मते, मिटींगमध्ये भारताकडून बलुचिलस्तानच्या बंडखोरांना दिली जाणारी मदत आणि नुकत्याच कराचीत झालेल्या स्फोटातील दहशतवाद्यांना दिलेल्या प्रशिक्षणाचा मुद्दा उचलला जाणार आहे. त्याशिवाय पाकिस्तान समझोता ब्लास्ट प्रकरणातील खटल्याची कारवाई वेगाने करण्याचा मुद्दाही उचलला जाण्याची शक्यता आहे. अफगाणिस्तान आणि इराणला लागून असलेल्या बलुचिस्तान प्रांतात मोठ्या कालावधीपासून पाकिस्तान आणि बंडखोरांमध्ये संघर्ष सुरू आहे. बंडखोर स्वातंत्र्याची मागणी करत आहे. तर भारत बलुचिस्तानात अशांती पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा पाकिस्तानचा आरोप आहे.

देशातील नागरिकांना खुश करण्याचा प्रयत्न
पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताच अजिज हे अजित डोभाल यांच्याशी चर्चेदरम्यान कागदपत्र सादर करणार आहेत. सरताच अजिज हे पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचे परराष्ट्र संबंधांचे सल्लागारही आहेत. प्रकरणाशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले की, पाकिस्तान देशातील नागरिकांना खुश करण्यासाठी काही ठरावीक मुद्दे उचलणार आहे. दोन्ही देशांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नवाज शरीफ काही दिवसांपूर्वीच रशियाच्या उफामध्ये बेटले होते. याचठिकाणी दोघांमध्ये एनएसए स्तरावरील चर्चेचा निर्णय जाला. या भेटीत दहशतवादाच्या मुद्यावर चर्चा होणार असल्याचे निश्चित करण्यात आले. मात्र या मुद्यावरून पाकिस्तानात नवाज शरीफ यांच्या विरोधात वातावरण तयार झाले. संयुक्त निवेदन भारताच्या बाजुने गेले असे म्हटले जात होते.

भारताची तयारी
भारत या भेटीमध्ये मुंबईवर झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याच्या खटल्याची पाकिस्तानात सुरू असलेली संथ सुनावणी आणि लश्करचा दहशतवादी झकी उर रेहमान लखवीला मिळालेल्या जामीनाचा मुद्दा उचलणार आहे.