आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तो अतिरेकी आमचा नाही : पाकचा दावा; पण वडिलाने मान्य केली वस्तुस्थिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/इस्लामाबाद- पाकिस्तान भलेही उधमपूरमध्ये पकडलेला अतिरेकी नावेद आपला नागरिक असल्याचे नाकारत असले तरीही पाकिस्तानमध्ये असलेले नावेदचे वडील मोहंमद याकूबने त्याची ओळख दिली आहे. याकूबने आपणच नावेदचे ‘बदनसीब बाप’ असून पाकमध्ये आपल्या जिवाला धोका असल्याची भीती व्यक्त केली. याकूब म्हणाला : ‘पाक सैन्य आणि लष्कर - ए- तोयबा आमचा पिच्छा पुरवत आहे. ते आम्हाला ठार मारून टाकतील.’ नावेदकडून मिळालेल्या मोबाइल नंबरवर एका इंग्रजी दैनिकाने याकूबशी चर्चा केली तेव्हा त्याने ही भीती बोलून दाखवली.

अतिरेकी मोहंमद नावेद उर्फ उस्मान फैसलाबादचाच असल्याचा दावा गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत केला. राजनाथ म्हणाले की, बीएसएफच्या दोन्ही शहिदांना शौर्य पुरस्कार देऊ. नावेदला पकडणारे विक्रम आणि राकेश यांचाही गौरव करण्याची शिफारस राज्य सरकारला करू, असे ते म्हणाले. तिकडे पाक परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सय्यद काझी खलीलुल्लाह यांनी भारत विनापुराव्याचे आरोप करत असल्याचे म्हटले आहे. भारतीय मीडियाने केलेल्या दाव्याचे ठोस पुरावे द्यावेत, असे ते म्हणाले. दरम्यान, एनआयएने उधमपूर हल्ल्याची चौकशी सुरू केली आहे. २००८ च्या मुंबई हल्ल्याचा तपास करणारे आयजी संजीवकुमार सिंह तिचे नेतृत्त्व करतील.आपण लष्कर - ए- तोयबाच्या ‘दौर - ए- आम’ व ‘दौर - ए- खास’या दोन सत्रांत प्रशिक्षण घेतल्याची कबुली नावेदने चौकशीत दिली.

खासदार धूत यांच्याकडून ५ लाख : शिवसेना खासदार राजकुमार धूत यांनी नावेदला पकडणारे विक्रम व राकेश यांना पाच लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे.
बातम्या आणखी आहेत...