आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकची मस्ती; पुन्हा गोळीबार, युद्धबंदीचे ऑगस्टमधील सर्वात मोठे उल्लंघन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू- सीमेवरपािकस्तानच्या कुरापती वाढत चालल्या असून रविवारी भारताच्या ४० चौक्या आणि २४ गावांत पाकिस्तानी जवानांनी गोळीबार केला. ऑगस्टमध्ये पाकने युद्धबंदीचे केलेले हे सर्वात मोठे उल्लंघन आहे.

या महिन्यात पाकने २३ वेळा युद्धबंदी मोडली. शनिवारी रात्री २५ चौक्या आणि १९ गावांत पािकस्तानी जवानांनी गोळीबार केला. भारतीय जवानांनीही त्यांना चोख प्रत्युत्तर दले. बीएसएफ अधिकाऱ्याने दिलेल्या मािहतीनुसार रविवारी रात्री साडेनऊ वाजता गोळीबार सुरू केला. प्रारंभी जम्मू जिल्ह्यात अर्निया, कानाचक, आरएसपुरा, अखनूर या सबसेक्टरमध्ये गोळीबार करण्यात आला. नंतर सांबा जिल्ह्यात रामगड सेक्टरला त्यांनी लक्ष्य केले. जम्मु काश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये ऑगस्टमध्ये झालेला हा पहिलाच गोळीबार आहे.

अस्थिर पािकस्तान : पािकस्तानमध्येअसलेली राजकीय अस्थिरता हेही सीमेवरील तणावाचे एक कारण मानले जात आहे. पािकस्तानी लष्करावर तेथील सरकारचा वचक रािहला नसल्याने सीमेवर तैनात जवानांनी या कुरापती सुरू केल्या असून यावर पंतप्रधान शरीफ यांनी अजून एकदाही भाष्य केलेले नाही.
शरीफ यांच्या दौऱ्यानंतर तणाव वाढला
पंतप्रधाननवाझ शरीफ यांनी भारत दौरा केल्यानंतर सीमेवर तणाव अधिक वाढला अाहे. भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी समारंभाला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान शरीफ मे महिन्यात भारतात आले होते. त्यानंतरच्या काळात सीमेवर पािकस्तानी लष्कराच्या कारवाया वाढत चालल्या आहेत.

तीन जण जखमी
रविवारी रात्रीपासून पाक जवानांनी सुरू केलेल्या गोळीबारात तीन लोक जखमी झाले आहेत. रात्रभर गोळीबार सुरू रािहल्याने अनेक गावांत लोकांनी रात्र जागून काढली. या गोळीबाराला भारतीय जवान चोख प्रत्युत्तर देत असले तरी रोज नव्या गावांना लक्ष्य करून गोळीबार केला जात असल्याने ताबारेषेवर तणाव वाढत चालला आहे.

लोकांचे स्थलांतर
गेल्यामहिनाभरापासून प्रत्यक्ष ताबारेषा आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकची हारािकरी सुरू आहे. पाक जवानांनी चालवलेल्या गोळीबारामुळे आिण उखळी तोफांच्या माऱ्यामुळे स्थािनक लोकांत प्रचंड दहशत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक गावांतील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून काही लोकांनी गाव सोडून इतर गावांत आश्रय घेतला आहे.