आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan Should Dismantle Terror Networks On Its Soil Us President Obama

ओबामांनी ठणकावले - पाकने देशातून चालत असलेल्या दहशतवादी कारवाया बंद केल्या पाहिजे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनी पाकिस्तानला त्यांच्या भूमीवरुन सुरु असलेल्या दहशतवादी कारवायांविरोधात ठोस कारवाईसाठी ठणकावले आहे.
पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ओबामा म्हणाले, 'पाकिस्तानने त्यांच्या भूमीवर सुरु असलेल्या दहशतवादी कारवायांना अवैध घोषित करण्याबरोबरच त्याविरोधात ठोस कारवाई केली पाहिजे.'

वर्षाच्या सुरुवातीलचा झालेल्या पठाणकोट हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी पाक पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यासोबत केलेल्या बातचीतचे ओबामांनी कौतूक केले. भारताचा आरोप आहे, की पठाणकोट हल्ला पाकस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने घडवून आणला.