आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रसिद्ध पाकिस्तानी गायक अदनान सामीला नवीन वर्षात मिळाले भारतीय नागरिकत्व

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पाकिस्तानमध्ये जन्मलेला गायक अदनान सामीला शुक्रवारी भारतीय नागरिकत्व मिळाले. नॉर्थ ब्लॉकमध्ये गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांच्याकडून नागरिकत्व प्रमाणपत्र मिळताच सामीने त्याचे ‘तेरी ऊंची शान है मौला...’ हे गीत गुणगुणले. त्यानंतर त्याने टa्विटरवर तिरंगी ध्वजातील तीन रंगांसह स्वत:चे छायाचित्र पोस्ट केले आणि ‘एक नवी सुरुवात... एक नवी जाणीव... नवी प्रेमकहाणी... नवा देश... जय हिंद!’ असे लिहिले.

नागरिकत्व मिळाल्यानंतर अदनान भावुक झाला होता. पत्नी रोयाची गळाभेट घेत अदनान म्हणाला, ‘एक जानेवारी २०१६ हा माझ्या जीवनातील सर्वात सुंदर दिवस आहे. माझा आज पुनर्जन्म झाला आहे. ’ अभिनेता आमिर खान आणि शाहरुख खानच्या असहिष्णुतेबद्दलच्या वक्तव्यावर अदनान म्हणाला, ‘आपले मत मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. त्यांची टिप्पणी त्यांच्या अनुभवावर आधारित आहे. असहिष्णुता असती तर मला भारतीय नागरिकत्व मिळालेच नसते. मला कधीही असहिष्णुता जाणवली नाही. भारतात कुठेही असहिष्णुता नाही.’

व्हिसाची मुदत वाढवण्यास भाजपचा हाेता विराेध
लाहोरमध्ये जन्मलेल्या अदनानच्या व्हिसाचा कालावधी यूपीए सरकारने वाढवला होता तेव्हा त्याला भाजपने विरोध केला होता. अदनान एक वर्षाच्या पर्यटक व्हिसावर ३१ मार्च २०११ ला पहिल्यांदा भारतात आला होता. त्याच्या पाक पासपोर्टची वैधता २६ मे २०१५ ला संपली होती. त्यानंतर पाकने पासपोर्टचे नूतनीकरण केले नव्हते. आपल्याला मानवीय आधारावर भारतात राहण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती त्याने केली होती. अदनानच्या ‘कभी तो नजर मिलाओ’ व ‘लिफ्ट करा दे’ या गाण्यांनी २००० च्या दशकात लक्ष वेधून घेतले होते.


पुढे वाचा, भाजपचा दुटप्पीपणा झाला उघड : शिवसेना