इस्लामाबाद/नवी दिल्ली - पाकिस्तान आणि अमेरिकेच्या संबंधांमध्ये तणाव वाढला आहे. पाकिस्तानचे वृत्तपत्र 'द डॉन' च्या वृत्तानुसार पाकिस्तान सरकारने अमेरिकेसोबतची सर्व चर्चा सध्या ठप्प केली आहे. याशिवाय पाकिस्तानी अधिकाऱ्यांना अमेरिकेला जाण्यापासूनही रोखण्यात आले आहे. परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ यांनी सोमवारी सीनेट मिटींगमध्ये याची माहिती दिली. आसिफ म्हणाले, त्यांचा देश अफगाणिस्तानमध्ये भारतीय मिलिटरीची भूमिका सहन करु शकत नाही. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला दहशतवाद्यांचे नंदनवन संबोधत वेळीच सुधरण्याचा इशारा दिला होता. त्यानंतरच पाकिस्तान आणि अमेरिकेचे संबंध बिघडत गेले.
रिपोर्टमध्ये आणखी काय म्हटले...
- द डॉनच्या रिपोर्टनुसार, ख्वाजा आसिफ यांनी महत्त्वाच्या बैठकीत अमेरिका आणि पाकिस्तानच्या संबंधावर माहिती दिली. यावेळी आसिफ यांनी स्पष्ट केले की पाकिस्तानने अमेरिसोबतची सर्व प्रकारची चर्चा बंद केली आहे. त्याशिवाय पाकिस्तानचे मंत्री किंवा अधिकारी अमेरिकेला जाणार नाही.
मात्र, अमेरिकेचे अधिकारी येणार
- पाकिस्तानने भलेही अमेरिकेसोबत बातचीत बंद केली आहे. मात्र हेही तेवढेच सत्य आहे की अमेरिकेने त्यांच्यासोबत कोणतीही चर्चा बंद केलेली नाही. मंगळवारी रात्री साऊथ आणि सेंट्रल आशिया अफेअर्सचे यूएस सेक्रेटरी एलिस विल्स पाकिस्तानला येत आहेत.
- विशेष म्हणजे आसिफ यांनाही पुढील आठवड्यात अमेरिकेला जायचे आहे. त्यांच्या या ताज्या वक्तव्यानंतर आता ते अमेरिका दौरा करतात की नाही हे पाहाणे औत्सूक्याचे ठरणार आहे. विशेष म्हणजे आसिफ यांनी अमेरिकेला जाण्याआधी या दौऱ्याची स्ट्रॅटेजी ठरविण्यासाठी आधी रशिया आणि चीनला जाण्याचे निश्चित केले आहे. अमेरिकेने त्यांच्या या रणनीतीला दबाव तंत्र म्हटले आहे.
भारताची अडचण
- आसिफ यांनी ज्या सीनेट मिटिंगमध्ये अमेरिकेच्या संबंधावर भाष्य केले त्याचे रितसर व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे.
- आसिफ म्हणाले होते की अमेरिका भारताला अफगाणिस्तानमध्ये जास्त महत्त्व देत आहे, पाकिस्तान हे कधीही सहन करणार नाही की भारताची मिलिटरी ताकद अफगाणिस्तानमध्ये मजबूत व्हावी.
- आसिफ असेही म्हणाले होते की भारत अफगाणिस्तानच्या आर्थिक विकासात मोठी मदत करत आहे.
- पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या बैठकीत असेही म्हटले गेले की भारत अफगाणिस्तानचा वापर पाकिस्तानला उद्धवस्त करण्यासाठी करु इच्छित आहे.