आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लखवीच्या आवाज नमुन्यावर पाकचे २ दिवसांत घूमजाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद/नवी दिल्ली - मुंबई हल्ल्याचा सूत्रधार झकी-उर-रेहमान लखवीच्या आवाजाचे नमुने भारताला सोपवण्याच्या मुद्द्यावर पाकिस्तानने दोनच दिवसांत कोलांटउडी घेतली. सरकारी वकिलांच्या टीमचे प्रमुख चौधरी अजहर म्हणाले की, आरोपीच्या आवाजाचा नमुना घेण्यासाठी पाकच्या कायद्यात कोणतीही तरतूद नाही. यामुळे सरकार नव्याने कोर्टात अर्ज दाखल करणार नाही.

रशियातील उफामध्ये दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची भेट झाली होती. त्यात लखवीच्या आवाजाचे नमुने भारताला दिले जातील, असे ठरले होते. मात्र, अजहर यांच्या वक्तव्याने त्याची शक्यता कमी झाली आहे. मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याच्या प्रकरणात या आधीही आवाजाचे नमुने घेण्याचा प्रयत्न अपयशी ठरल्याचे ते म्हणाले. २०११ मध्ये न्यायाधीश अक्रम अवान यांनी अर्ज फेटाळला होता. लखवीचे वकील रिझवान अब्बासी म्हणाले, आपल्या अशिलाने आधीही नमुने देण्यास नकार दिला होता, पुढेही तसेच होईल. लखवीविरुद्ध सात वर्षांपासून खटला सुरू आहे. मात्र, कोणतेही पुरावे सादर करता आलेले नाहीत.
दरम्यान, सुरक्षा दलांनी काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्याच्या केरन सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखाेरीचा प्रयत्न उधळला आहे. यात तीन अतिरेकी ठार झाले.

चकमकीत तीन अतिरेक्यांना ठार करण्यात आले. एक वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने सांगितले की, केरन सेक्टरमध्ये मध्यरात्री एलओसीवरील कुंपणाजवळ जवानांनी संशयास्पद हालचाली पाहिल्या. कुंपण कापले जात असल्याचे दिसताच जवानांनी घुसखोरांना ललकारले. काही तासांच्या गोळीबारानंतर सकाळी तपासणीदरम्यान तीन मृतदेह ताब्यात घेण्यात आले. तीन एके रायफली, १२ मॅगेझिन, ३०० काडतसे, दोन ग्रेनेड आणि इतर सामग्री जप्त करण्यात आली. कुपवाडा जिल्ह्यात एलओसीजवळ तंगधार सेक्टरमध्ये याच वर्षी २५ मे, ३१ मे अाणि ६ जूनला घुसखोरीचे तीन प्रयत्न उधळण्यात आले होते.
बातम्या आणखी आहेत...