आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan Under Pressure To Put An End To Border Firing

सीमेवर फायरिंगचे प्रमाण घटले, पाकिस्तानकडून हॉकीतील पराभवाचा बदला, BSF चा दावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/जम्मू - भारतीय लष्कराकडून फायरिंगला चोख प्रत्युत्तर मिळाल्यानंतर पाकिस्तानकडून केल्या जाणा-या फायरिंग प्रमाण घटले आहे. मात्र, तरीही अजूनही काही भागांमध्ये फायरिंग सुरुच आहे. गुरुवारी रात्री भारताच्या पाच चौक्यांना लक्ष्य करण्यात आले. हिरानगरमध्ये भारताच्या चार पोस्टवर फायरिंग झाली. भारतीय जवानांच्या चेतावनीनंतरही सुमारे 20 मिनिट फायरिंग सुरू होती.
हॉकीतील पराभवामुळे फायरिंग...
पाकिस्तानच्या नागरिकांना लक्ष्य करून फायरिंग केली जात नसल्याचे BSF ने स्पष्ट केले आहे. बीएसएफचे संचालक जनरल डीके पाठक म्हणाले की, त्यांनी केवळ सीमेपलिकडून केल्या जाणा-या फायरिंगला प्रत्युत्तर दिले. एशियन गेम्समध्ये हॉकीत भारताकडून पाकचा पराभव झाल्यानंतर पाकिस्तानी चौक्यांकडून फायरिंग सुरू करण्यात आली होती. पण जवानांनी त्यावेळी त्यांना प्रत्युत्तर दिले नाही. सामान्य नागरिकांना मारल्याच्या आरोपांन उत्तर देताना पाठक म्हणाले की, बहुतांश चौक्या आंतरराष्ट्रीय सीमेला लागून आहेत. त्यालाच लागून पाकिस्तानची अनेक गावेही आहेत. त्यामुळे भारताने उत्तरादाखल केलेल्या कारवाईत नागरिकांचा मृत्यू झाला.

पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांची अतिशयोक्ती
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी काहीशा धमकीच्या स्वरात सांगितले की, पाकिस्तान, भारताला उत्तर देण्यास पूर्णपणे सक्षम आहे. सीमेवरील तणावाचे रुपांतर दोन अण्वस्त्रधारी शेजा-यांच्या भांडणाचे कारण बनावे अशी आमची इच्छा नाही.
ब्रह्मोस तैनात करण्याची तयारी
भारताने पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यासाठी गरज पडल्यास अंतरराष्ट्रीय सीमेवर ब्राह्मोस क्षेपणास्त्र तैनात करण्याची तयारीही केली आहे. तसेच टँक ब्रिगेडलाही सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वेस्टर्न नेव्हल कमांडही सतर्क आहे. आंतरराष्ट्रीय सीमा वगळता दुसरीकडे पाकिस्तानने काही हालचाल केल्यास उत्तर देण्यासाठी सज्ज असावे म्हणून ही तयारी करण्यात आली आहे. सध्या 105 ते 120 एमएम गन आणि 155 एमएम होवित्झर तोफा, हेवी रॉकेट, बॅटरी आणि 81 एमएम मोर्टार यूनिट पाकिस्तानला प्रत्युत्तर देत आहे. 10 हजाराहून अधिक ग्रेने़ड आणि 5 लाख राउंडपेक्षा अधिक गोळ्यांचा वापर आतापर्यंत करण्यात आला आहे. पाकिस्तानच्या सुमारे 80 ते 90 पोस्ट उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानच्या सीमाभागात सुमारे 400-500 दहशतवादी घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत. त्यांना कव्हर देण्यासाठीच फायरिंग केली जात आहे.
शरीफ यांनी बोलावली बैठक
भारताच्या वक्तव्यांनी पाकिस्तानमध्ये खळबळ माजली आहे. पंतप्रधान नवाज शरीफ यांनी शुक्रवारी राष्ट्रीय सुरक्षा समिती (एनएससी) ची बैठक बोलावली आहे. दुसरीकडे, अरुण जेटलींना उत्तर देताना पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या तसनीम असलम म्हणाल्या की, आम्हीही उत्तर द्यायला सक्षम आहोत. पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे प्रमुख इमरान खान यांनी शरीफ यांच्यावर टीका केली आहे. अशा स्थितीत देशाच्या आशा नेत्यावर असतात. पण नवाज शरीफ कुठेच दिसत नाहीत.
पुढील स्लाइडवर पाहा, पाकिस्तानातील हद्दीत असलेल्या घरांची झालेली अवस्था