आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan Violates Ceasefire Again, Targets 25 BSF Posts In J&k,Latest News In Marathi

धुमश्चक्री: जम्मूत सहा अतिरेक्यांचा खात्मा, दोन जवान शहीद, गोळीबार सुरूच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू, नवी दिल्ली- ताबा रेषेवर तणाव वाढत चालला असून कुपवाडा जिल्ह्यात भारतीय लष्कराने चार अतिरेक्यांना गोळ्या घातल्या. या चकमकीत दोन जवानही शहीद झाले आहेत. दुसरीकडे २५ भारतीय चौक्यांवर पाकिस्तानी सैनिकांनी तुफान गोळीबार केला. १९ गावांना यात लक्ष्य करण्यात आले. शनिवारी रात्रभर हा गोळीबार सुरू होता. सीमा सुरक्षा दलानेही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले.
कुपवाडा जिल्ह्यात अतिरेक्यांनी घुसखोरी केल्याची माहिती मिळाल्यानंतर भारतीय लष्कराने या भागात जोरदार शोधमोहीम राबवली. यादरम्यान कालारूस जंगलात अतिरेक्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. यात चार अतिरेकी मारले गेले. नीरजकुमारिसंह हा जवान शहीद झाला. केरन सेक्टरमध्ये दुसरी चकमक झाली. यात राहुलकुमार हा उत्तरप्रदेशचा जवान शहीद झाला. या चकमकीनंतर अतिरेकी पळून गेले. या भागाला भारतीय लष्कराने वेढले आहे. या भागात बुधवारी दोन अतिरेकी मारले गेले होते. दरम्यान, जम्मू सेक्टरमध्ये एका चकमकीत घुसखोरी करणारे दोन अतितरेकी मारले गेले असल्याचा दावा सीमा सुरक्षा दलाने केला.
२५ चौक्या, १९ गावे पाक सैनिकांनी केली लक्ष्य
फ्लॅग मीटिंगला नकार

पाकच्या राष्ट्रीय सुरक्षा व परराष्ट्र विभागाचे सल्लागार सरताज अजीज यांनी चर्चेचा प्रस्ताव ठेवला आहे. दुसरीकडे पाकिस्तानी लष्कराकडून मात्र फ्लॅग मीटिंगला प्रतिसाद दिला जात नाही.

शस्त्रसाठा जप्त
किश्तवारमध्ये हिजबुल मुजांहिदीनचा शस्त्रसाठा जप्त. ७३ हातबॉम्ब, साडेतीन हजार राउंड, तीन रिव्हॉल्व्हर, दोन पिस्तुले, ६ ग्रेनेड, एक एके-५६ रायफल आणि एक ९ एमएम कार्बाइन जप्त.

पाकिस्तानी नागरिकाचा जीव वाचवला
सीमेवर सध्या गोळीबार आणि अतिरेक्यांची घुसखोरी सुरू असताना भारतीय लष्कराने मात्र माणुसकी सोडलेली नाही. व्याप्त काश्मीरमधील रहिवासी असलेले ७२ वर्षीय मंगता खान यांचा जीव भारतीय जवानांनी वाचवला आणि त्यांना सुरक्षितरीत्या पोहोचवले. या वेळी त्याच्या नातेवाइकांनी भारतीय जवानांना मिठाई दिली.
२० गावांतील लोकांना हलवले : जम्मू जिल्ह्यात शनिवारी रात्री अरनिया व आरएसपुरा सेक्टरमध्ये अतिरेक्यांनी तुफान गोळीबार केला. नागरी वस्त्यांवरही हातबाँब फेकले. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू होता. अतिरेक्यांनी आता नागरी वस्त्या लक्ष्य केल्याने २० गावांतील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, मागील काही दिवसांपासून पाकिस्तानी सैन्याकडून होणार्‍या गोळीबाराची बोलकी छायाचित्रे...


(फोटो: जम्मूच्या सीमेवरील एक गावातील घराच्या ‍भिंतीवर पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबाराचे निशाण दाखवताना चिमुखले)