आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानने केले शस्त्रसंधीचे उल्लंघन, भारतीय सीमेच्या जवळ आले दोन जेट लढाऊ विमान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू/इस्लामाबाद - पाकिस्तानने पुन्हा एकदा सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानच्या दोन रेंजर्सने आरएस पुरा सेक्टरमध्ये नौवापिंड सीमेवरील तीन मोर्टार फोडले. सुदैवाने या मोर्टार हल्ल्यात कोणीच जखमी झाले नाही. बीएसएफने या हल्ल्याचा कोणतेही प्रत्यूत्तर दिलेले नाही. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्रालयाकडून या बद्दल अशी प्रतिक्रिया देण्यात आली आहे की, एलओसीजवळ भारताकडून करण्यात आलेल्या गोळीबारामुळे रावलकोट सेक्टरमधील पोलस गावातील एक 60 वर्षीय व्यक्ती ठार झाल्याचे सांगितले आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानचे दोन जेट लढाऊ विमान शुक्रवारी जम्मू-कश्मीरजवळील आरएस पुरा येथील भारतीय सीमेच्या एकदम जवळून गेले. यामुळे बीएसएफने पाकिस्तानच्या या कृत्याचा विरोध केला आहे.

पाकिस्तानचे दोन लढाऊ विमान शुक्रवारी जम्मू-कश्मीरच्या भारतीय सीमेच्या एकदम जवळ आले होते. बीएसएफचे आयजी राकेश शर्मा यांनी शनिवारी सांगितले की, पाकिस्तानचे दोन लढाऊ विमान भारतीय सीमेच्या जवळ आले होते, मात्र काही सेकंदातच ते परतले.मात्र हे वायुसीमेचे अतिक्रमण मानण्यास शर्मा यांनी नकार दिला आहे.
अंतरराष्ट्रीय सीमेवर 500 मीटरपर्यंतच्या वायुसीमेत इतर देशांचे विमान प्रवेश करू शकत नाही. त्यामुळेच पाकिस्तानी जेट विमानांना भारततीय सीमेजवळून उडवल्याबद्दल भारताने विरोध दर्शवला आहे. पाकिस्तानचे हे दोन्ही जेट लढाऊ विमान भारतीय सीमेवरील आरएस पुरा सेक्टरमध्ये 600 मीटरपर्यंत आत आले होते. हे विमान पावणे दोन वाजता भारतीय सीमेवरील खतमारियान चौकीमध्ये आले होते.त्यांनंतर ते पाकिस्तानच्या नंदपूर चौकीवरून परतले. हे दोन्ही विमानांनी अब्दुलियान आणि टीडब्ल्यू 5 के 600 से 700 मीटर की ऊंचाई पर चक्कर काटा।