आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकने स्वत:चे ड्रोन पाडले, भारताचे भासवले, आगळीक केल्यास ‘चोख’ प्रत्युत्तर -भारत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पाकिस्तानकडून सीमेवर कुरापती सुरूच असून युद्धबंदीच्या उल्लंघनामुळे दोन्ही बाजूंची हानी झाल्यामुळे सीमेवरील तणाव वाढला आहे. पाकिस्तानने आपलेच ड्रोन पाडून ते हेरगिरी करणारे भारतीय ड्रोन असल्याचा दावा करून तणावात आणखीच भर घातली आहे. पाकिस्तानने चिथावणी दिल्यास जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल, असा सज्जड इशारा भारताने दिला आहे.

दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी रशियातील उफामधील भेटीत द्विपक्षीय चर्चा पुन्हा सुरु करण्यास सहमती दर्शवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पाककडून सीमेवर बेछूट गोळीबार सुरू करण्यात आला आहे. सीमेवर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांची तातडीची बैठक झाली. या बैठकीला डोभाल आणि परराष्ट्र सचिवही हजर होते. त्यानंतर भारताने पाकला हा इशारा दिला आहे.

हात बांधून बसणार नाही
^सीमेवर शांतता आणि स्थैर्य रहावे यासाठी भारत बांधील आहे, परंतु पाकिस्तानकडून कोणतीही चिथावणी देण्याचा प्रयत्न झाला तर मात्र त्याला चोख प्रत्युत्तर देऊ. सीमेपलीकडून घुसखोरी आणि दहशतवाद पसरवला जात असेल तर आम्ही हात बांधून बसणार नाही.
-एस. जयशंकर, परराष्ट्र सचिव
पाकिस्तानचे दावे
1 आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग करून पाकिस्तानी हवाई हद्दीत येऊन भारतीय ड्रोन विमान हेरगिरी करत होते. पाकिस्तानी रेंजर्सनी ते पाडले.
2भारतानेच युद्धबंदी मोडून केलेल्या गोळीबारात चार आमचे नागरिक ठार झाले आहेत.
3११जुलै २०१५ रोजी एलओसीवर भारताने चिथावणीखोर हेलिकॉप्टर युद्ध सराव करून आम्हाला धमकावले. ही कारवाई चिथावणीखोर होती.
भारताचे प्रत्युत्तर
1 भारताचे ड्रोन पाकिस्तानी हद्दीत गेले नाही. पाकने छायाचित्र दाखवलेले ड्रोन भारतीय बनावटीचे नाही किंवा तसे ड्रोन भारतीय लष्करातही नाही.
2पाकनेच अखनूरमध्ये केलेल्या गोळीबारत महिला ठार तर १० भारतीय जखमी झाले.
3दहशतावादविरोधीमोहिमेत हेलिकॉप्टर उड्डाणे होती. त्यात अतिरेकी मारले गेले. त्याची माहिती स्थानिक कमांडर्सना १२ जुलैलाच दिली होती.

द्विपक्षीय बाेलणीवर अनिश्चिततेचे सावट
या तणावामुळे दोन्ही देशांतील राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार स्तरावरील द्विपक्षीय चर्चेवर संकटाचे ढग दाटले आहेत. या चर्चेची तारीखच ठरली नाही तर पुढे ढकलण्याचा प्रश्नच नाही, असे सांगत भारताने ही चर्चा होईल की नाही, हे स्पष्ट केले नाही.

मोदींच्या जम्मू दौऱ्याचा मूहूर्त साधला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जम्मू दौऱ्याच्या एक दिवस आधीच पाक बंदुका आग ओकत आहेत.असे करण्याची पाकची ही पहिलीच वेळ नाही. दरम्यान, गेल्या दोन आठवड्यांपासून युद्धबंदी उल्लंघनाच्या घटना वाढल्याचे उत्तर कमांडचे लेफ्टनंट जनरल डी. एस. साहू यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...