आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 4 Feared Killed As Explosives laden Pakistan Vessel Sinks Off Gujarat

अतिरेकी हल्ल्याचे षड‌्यंत्र उधळले! गुजरातच्या समुद्रात पाकिस्तानी बोटीची घुसखोरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - तटरक्षक दलाने अतिरेक्यांचा मुंबईच्या २६/११ हल्ल्यासारखा कट उधळून लावला. कराचीहून अतिरेक्यांची बोट पोरबंदरकडे येत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. शरणागती पत्करण्यास सांगितल्यावर बोटीवरील अतिरेक्यांनी स्वत:ला उडवून दिले. ३१ डिसेंबर जानेवारीच्या रात्री ही घटना घडली.

तटरक्षक दलाचे डीडीजी के.आर. नौटियाल म्हणाले, बोटीवर स्फोटके शस्त्रास्त्रे होती. भारतीय हद्दीत ते १० किमीपर्यंत ती शिरली. किनार्‍यापासून बोट ३५० किमीवर होती. लष्कर-ए-तोएबाने कट रचला होता. त्यांच्याकडे मरीन विंग आहे, अशी गुप्तचरांची माहिती आहे. जानेवारी रोजी दुपारपर्यंत भारतीय सीमेत दाखल होण्याचा अतिरेक्यांचा इरादा होता. २००८ मध्येही मुंबईवर हल्ला करणारे १० अतिरेकी कराचीहून समुद्री मार्गेच अशाच बोटीतून आले होते.

एनटीआरओला पहिली माहिती
9.30 वा. सकाळी: एनटीआरओने३१ डिसेंबरला संदेश पकडला. कराचीहून अतिरेकी फोनवर बोलत होते. तुमच्याकुटुंबीयांना पाच लाख रुपये दिले आहेत. शेवटचा संदेश होता- आम्हालाशस्त्रास्त्रे मिळाली.

डॉर्नियर विमानाने बोट शोधली
11.30 वा. सकाळी : कोस्टगार्डने डॉर्नियर हे टेहळणी विमान अरबी समुद्राकडे धाडले. विमानाने संशयित बोट पाहिली. त्याची माहिती बेसला कळवली. कोस्ट गार्डच्या "राजरतन' जहाजाला बोटीकडे रवाना केले. काही जहाजे सज्ज ठेवली. डॉर्नियरने बोटीवर करडी नजर ठेवली.

लाइट बंद करून काढला पळ
11.00 वा. रात्री : "राजरतन'जहाज पाकिस्तानी बोटीजवळ पोहोचले. कमांडंट तासभर बोटीला संदेश पाठवत होते. अतिरेकी आत्मसमर्पणाऐवजी बोटीचे दिवे बंद करून पळू लागले. शेवटी"राजरतन'वरून गोळीबारकरण्यात आला.

अतिरेक्यांनी बोटीला आग लावली
3.00 वा. पहाटे: घेरल्यानंतरबोटीच्या डेकवर दिसणारे चार जण खाली गेले. काही वेळेनंतर त्यांनी बोटीला आग लावली. त्यानंतर जोरदार स्फोट होऊन बोट जळू लागली आणि सकाळी ६.३० वाजता बुडाली. ढिगार्‍यांचा शोध सुरू असून दोन जहाजे सहा विमाने कामात आहेत.

...कदाचित हेच असावे लक्ष्य
- ७ ते ९ जानेवारीत गांधीनगरात आयोजित प्रवासी भारतीय संमेलन.
- ११ ते १३ जानेवारीदरम्यान गांधीनगरातीलच व्हायब्रंट गुजरात मीट.
- यंदाच्या प्रजासत्ताकदिनी बराक ओबामा यांचा भारत दौरा
- १२ जानेवारी रोजीचे पोरबंदर नौदल तळाचे उद‌्घाटन.