आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकचा सूर बदलला, युद्ध हा तोडगा नव्हे; काश्मीरी भारतासोबत आनंदी असतील तर हरकत नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- उरी हल्ल्यानंतर भारताने आक्रमक पवित्रा घेतला आहे. तो पाहून पाकिस्तान अस्वस्थ झाला असून त्याचा सूरही बदलला आहे. एकीकडे भारत आज सिंधु पाणी करारावर पाकच्या भविष्याचा निर्णय घेणार असताना दुसरीकडे, पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी सारवासारव केली आहे.

दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरु असून जम्मू-काश्मीरमधील जनतेला आपल्या भविष्याचा निर्णय घेण्याची संधी मिळायला हवी, हेच आमचे म्हणणे आहे. युद्ध हे कुठल्याही प्रकरणावरील तोडगा नाही. जम्मू-काश्मीरच्या लोकांना आपल्या भविष्याचा विचार करण्याची चांगली संधी मिळायला हवी. भारतात जास्त खूश आहोत असे त्यांना वाटते असेल तर त्यांनी तेथेच राहावे, पाकिस्तानचा त्याबद्दल आक्षेप नाही. कोणत्याही भागावर दावा करण्याची आमची इच्छा नाही. हा एखाद्या भागाबाबतचा वाद नाही. तेथील एक कोटी 20 लाख लोकांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. काश्मीरी जनता भारतात राहून आनंदी असेेल तर काहीच हरकत नाही. पाकिस्तान यात भविष्यात हस्तक्षेप करणार नसल्याचे पाक उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी सांगितले. ते एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखती‍त बोलत होते.

बासित यांनी सांगितले की, पठाणकोट हल्ल्यानंतर आम्ही योग्य दिशेने जात होतो. पण, काश्मीरमध्ये 8 जुलैला झालेल्या घटनेनंतर जे झाले ते सगळ्यांनी पाहिले आहे. त्यामुळे उभय देशामधील चर्चा पून्हा एकदा मागे पडली आहे. दरम्यान, 8 जुलैला बुरहान वानीचे एन्काउंटर झाले होते. त्यानंतर काश्मीर खोर्‍यात प्रचंड तणाव पसरला होता. अनेक जिल्ह्यात संचारबंधी लागू करण्यात आली होती. काश्मीरमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीवरुन संयुक्त राष्ट्रामध्ये पाकिस्तानने भारताची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.

नवाझ शरीफ यांनी भाषणात ठार झालेल्या दहशतवादीचा उल्लेख 'युवा नेता' म्हणून केला. संयुक्त राष्ट्रातील भारताचे कायमस्वरुपी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी यावर पाकिस्तानला खडे बोल सुनावले. पाकिस्तान एक देश म्हणून दहशतवादाचा धोरणासारखा वापर करत आहे. तसेच दहशतवादाचा मानवी हक्क समर्थनासाठी वापर करत आहे, अशा स्पष्ट शब्दात भारताने पाकिस्तानला सुनावले.

दरम्यान, मोदींंनी कोझीकोडच्या सभेत पाकिस्तान आणि तेथील नेत्यांंवर जोरदार निशाणा साधला होता. 18 जवानांंचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, पाकिस्तानला आंंतराष्ट्रीय स्तरावर वेगळे पाडू, असे त्यांनी म्हटले होते.

पुढील स्लाइडवर वाचा, हाफिज, सलाउद्दीनला पाक का रोखत नाही?
बातम्या आणखी आहेत...