आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीत एकाच घरात राहतात 480 पाकिस्तानी हिंदू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पाकिस्तानचे 480 हिंदू कुंभमेळ्यासाठी भारतात आले होते. एक महिना व्हिसाच्या मुदतीवर आलेल्या या नागरिकांची परत पाकिस्तानमध्ये जाण्याची इच्छा नाही. दिल्लीनजीकच्या कापसहेडा गावात सर्व पाकिस्तानी हिंदू एकाच घरात राहत आहेत.

कापसहेडा येथील नाहर सिंह यांच्या मोठ्या घरात 28 खोल्या आहेत. पाकिस्तानी हिंदू येथे दाखल झाल्यापासून सुरू असलेल्या येथील शाळेला सुटी देण्यात आली आहे. साधारण 100 चौ. फुटांच्या एका खोलीत 20-20 लोक राहत आहेत. यामध्ये पाच महिन्यांच्या मुलीपासून 110 वर्षांच्या बुजुर्ग महिलेचा समावेश आहे. या सर्वांच्या व्हिसाची मुदत 8 एप्रिल रोजी संपत आहे. त्यांचा व्हिसा वाढवला जाईल, असे गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

अपमानापेक्षा अडचणी ब-या
या जत्थ्यातील काही लोक म्हणाले की, पाकिस्तानमधील अपमानास्पद वागणुकीपेक्षा येथील अडचणी चांगल्या आहेत. भारताने क्रिकेट सामना जिंकल्यानंतर आमच्यावर विनाकारण राग काढला जातो, असे हनुमान सिंह म्हणाले. विराट कोहलीने चांगला खेळ केल्यानंतर कोहली समाजाच्या तीन मुलींचे अपहरण करण्यात आले असून त्यांचा अद्याप ठावठिकाणा नाही.

हिंदूंना शिक्षणाचा हक्क नाही
जमुना म्हणाल्या, आमच्यापैकी कुणीही साक्षर नाही. आम्हाला पाकिस्तानमध्ये शिक्षणाचा अधिकार नाही. मुलींचे अपहरण टाळण्यासाठी लहानपणीच त्यांचे लग्न लावावे लागते. रामकलीचे लग्न दहाव्या वर्षी झाले. तेराव्या वर्षी ती दोन मुलांची आई आहे. कमी वजनामुळे दोघांचा मृत्यू झाला.