आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानी गुप्तचर संस्थेने केली होती गझल गायक जगजीतसिंहांची हेरगिरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पाकिस्तान गुप्तचर संस्थाने प्रसिद्ध गझल गायक जगजीतसिंह यांची हेरगिरी केली होती. दिवंगत जगजीतसिंह यांच्यावर लिहिलेल्या नव्या पुस्तकात हा दावा करण्यात आला आहे. त्यात म्हटले आहे, की 1979 मध्ये जगजीत प्रथमच पाकिस्तानात गेले होते, तेव्हा त्यांच्यामागे हेर लावण्यात आले होते. त्यांच्या मागावर असलेला पाकिस्तानी अधिकारी योगायोगाने त्यांचा फॅन निघाला होता. या घटनेचा उल्लेक सत्य सरन लिखित 'बात निकलेगी तो फिर... द लाइफ अँड म्यूझिक ऑफ जगजीत सिंह' पुस्तकात आहे.
चित्रा सिंह काय म्हणाल्या
>> भारतीय गझल गायक जगजीतसिंह पाकिस्तान दौऱ्यावर गेले होते तेव्हा त्यांच्यासोबत पत्नी चित्रा देखील होत्या. त्यांच्या हवाल्याने पुस्तकात लिहिले आहे, की जेव्हा आम्ही पाकिस्तानात गेलो होतो तेव्हा राजकीय परिस्थिती तणावपूर्ण होती. आम्हालाही त्याचा अंदाज आला होता. जेव्हा आम्ही तिथे उतरलो तेव्हा आमच्या लक्षात आले की एक व्यक्ती आमचा पाठलाग करत आहे. आम्ही बऱ्याच ठिकाणी त्याला परत-परत पाहिले. विमानतळापासून तो आमच्या मागे-पुढे होता. आम्ही ज्या हॉटेलात थांबलो होतो, तिथेही तो दिसला होता. ही घटना आमच्या आत्मविश्वासाचे खच्चिकरण करणारी होती.

>> चित्रा सिंहने सांगितले, 'डोअरबेल वाजली. जगजीतने दरवाजा उघडला आणि बाहेर तो (हेरगिरी करणारा अधिकारी) उभा होता. तो आत घुसला. जगजीतने त्याला विचारले तु आमच्या मागावर आहेस का? त्याने सांगितले मी तुमचा फॅन आहे आणि त्याने इशाऱ्यानेच सांगितले, की रुममध्येही तुमच्यावर नजर ठेवली जात आहे.'

>> चित्रा सिंह यांनी सांगितले, 'त्याने सांगितले की तो गुप्तचर संस्थेचा अधिकारी आहे. त्याने कोटाच्या आतून पेपर मध्ये गुंडाळून आणलेली दारुची बाटली मोठ्या अदबीने जगजीतच्या हातात दिली. ती त्याच्याकडून आम्हाला दिलेली भेट होती. कारण हॉटेलमध्ये (दारू) त्यावर बंदी होती.'

पाकिस्तानने कार्यक्रमावर घातली होती बंदी
>> या पुस्तकात चित्रा यांच्या हवाल्याने लिहिले आहे, की पाकिस्तानात त्यांच्या कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली होती. मात्र त्यांना प्रेसक्लबकडून मिळालेल्या निमंत्रणानतर तिथेच त्यांचा कार्यक्रम झाला होता.
>> चित्रासिंह यांनी त्यांना मिळालेली नोटीस दाखवली होती, ज्यात त्यांना 20 फेब्रुवारी पर्यंत थांबण्याची परवानगी दिली होती.