नवी दिल्ली - 'भारताकडून काश्मिर घेतल्याशिवाय राहाणार नाही', अशी इच्छा उरी बाळगून असलेले पाकिस्तानी नेते बिलावल भुट्टो यांच्या तोंडाचा पट्टा पुन्हा एकदा सुटला आहे. मात्र, यावेळी सोशल मीडियावर त्यांची चांगलीच थट्टा होत आहे. मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइट
ट्विटरवर #yobilawalsodumb ट्रेंड करत आहे. यावर लोक त्यांची थट्टा करत आहे.
पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांचे चिरंजीव बिलावल भुट्टो यांनी ट्विटरवर शस्त्रसंधी उल्लंघनाचा उल्लेख करुन लिहिले आहे, 'एलओसीवर सुरु असलेल्या हल्ल्यांवरुन असे वाटत आहे, की भारताने इस्त्रायल मॉडेल स्विकारले आहे.' एवढ्यावरच बिलावल थांबले नाही तर, पंतप्रधान मोदींवर निशाणा साधताना त्यांनी म्हटले, 'मोदींनी लक्षात घेतले पाहिजे आम्ही (पाकिस्तान) काही गुजरात पीडित नाही, जे भारताला प्रत्युत्तर देऊ शकणार नाही.'
बिलावल यांनी भारताविरोधात गरळ तर ओकली, पण ट्विटरवर इस्त्रायलची स्पेलिंग चुकीची लिहिली. त्यानंतर ट्विटर युजर्सनी त्यांची जोरदार खिल्ली उडवली. pracchannAstrin या नावाने ट्विटर अकाऊंट असलेल्या युजरने लिहिले, '@BBhuttoZardari तुम्हाला किंडरगार्टनमध्ये स्पेलिंग शिकवले नाही का? बच्चे हे I S R A E L आहे. आता याची दहावेळी घोकंपट्टी कर.' बिलावल यांनी Israel ऐवजी Israle लिहिले होते.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, ट्विटरवर कशी झाली बिलावल यांची फजिती