आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistani Man Told The Police Force That He Had Hoisted The Indian Flag

\'पाक\'मध्ये तिरंगा फडकवणाऱ्या विराटच्या फॅनला होऊ शकते 10 वर्षे कैदेची शिक्षा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानात तिरंगा फडकवणारा उमर दराज - Divya Marathi
पाकिस्तानात तिरंगा फडकवणारा उमर दराज
नवी दिल्ली - पाकिस्तानात टीम इंडियाच्या विजयाचा आनंद साजरा करताना तिरंगा फडकवणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून गुन्हा सिद्ध झाल्यास 10 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. त्याला दोन दिवसांपूर्वी अटक करण्यात आली. मंगळवारी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील ओकारा (लाहोरपासून 200 किमी अंतरावर) येथे तिरंगा फडकवल्याचा प्रकार घडला. टीम इंडियाने अॅडिलेड टी-20 समान्यात ऑस्ट्रेलियाला 37 रन्सने पराभूत केले होते, त्यानंतर हा प्रकार घडला होता.
अटकेनंतर कोहलीचा फॅन काय म्हणाला...
पाकिस्तानात भारतीय झेंडा फडकवल्याच्या आरोपात अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव उमर दराज असून त्याला सुरुवातीला न्यायालयिन कोठडी सुनावण्यात आली आहे. उमरने त्याच्या घरावर तिरंगा फडकवला होता. बीबीसी उर्दूच्या वृत्तानुसार, उमरने पोलिसांना सांगितले, 'मी भारतीय क्रिकेटर विराट कोहलीचा फॅन आहे. त्यासाठी असे केले. मला एक आरोपी किंवा हेर म्हणून पाहू नका, टीम इंडियाचा फॅन म्हणून माझ्याकडे बघा. मी कोणतेही चुकीचे काम केलेले नाही.'
पाकिस्तान पोलिसांनी त्याच्याविरोधात MPO-16 आणि पाकिस्तान पीनल कोड 123-A नुसार गुन्हा दाखल केला आहे, या कायद्यातील तरतुदीनूसार गुन्हा सिद्ध झाला तर उमरला दहा वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.
पोलिस काय म्हणाले
येथील पोलिस अधिकारी म्हणाले, 'तक्रार मिळाल्यानंतर आम्ही उमरच्या घरी छापा टाकला. त्याच्या घरावर तिरंगा फडकत होता. उमरच्या घरात भिंतीवर विराट कोहलीचे पोस्टर लावलेले होते.'
पुढील स्लाइडमध्ये, पाक हिंदू क्रिकेटपटू कनेरिया म्हणाला, मी मरतोय, BCCI ने मदत करावी