आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistani Man Told The Police Force That He Had Hoisted The Indian Flag At His House

इंडिया जिंकल्यानंतर पाकिस्तानात झेंडा फडकवणारा कोहलीचा फॅन अरेस्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पाकिस्तानात एका व्यक्तीला टीम इंडियाच्या विजयाच्या जल्लोषात तिरंगा फडकवल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. अशी माहिती आहे, की अटक करण्यात आलेला विराट कोहलीचा मोठा फॅन आहे. मंगळवारी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील ओकारा (लाहोरपासून 200 किमी अंतरावर) येथे तिरंगा फडकवल्याचा प्रकार घडला. टीम इंडियाने अॅडिलेड टी-20 समान्यात ऑस्ट्रेलियाला 37 रन्सने पराभूत केले होते.

अटकेनंतर कोहलीचा फॅन काय म्हणाला...
पाकिस्तानात भारतीय झेंडा फडकवल्याच्या आरोपात अटक करण्यात आलेल्याचे नाव उमर दराज असून त्याला न्यायालयिन कोठडी सुनावण्यात आली. उमरने त्याच्या घरावर तिरंगा फडकवला होता. बीबीसी उर्दूच्या वृत्तानुसार, उमरने पोलिसांना सांगितले, 'मी भारतीय क्रिकेटर विराट कोहलीचा फॅन आहे. त्यासाठी असे केले. मला एक आरोपी किंवा हेर म्हणून पाहू नका, टीम इंडियाचा फॅन म्हणून माझ्याकडे बघा. मी कोणतेही चुकीचे काम केलेले नाही.'
पाकिस्तान पोलिसांनी त्याच्याविरोधात MPO-16 आणि पाकिस्तान पीनल कोड 123-A नुसार गुन्हा दाखल केल आहे.

पोलिस काय म्हणाले
येथील पोलिस अधिकारी म्हणाले, 'तक्रार मिळाल्यानंतर आम्ही उमरच्या घरी छापा टाकला. त्याच्या घरावर तिरंगा फडकत होता. उमरच्या घरात भिंतीवर विराट कोहलीचे पोस्टर लावलेले होते.'
पुढील स्लाइडमध्ये पाहा अधिक फोटो