आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-अमेरिका मैत्रीमुळे पाकचा जळफळाट, मिडियाने मोदींना ठरवले गाढव, खाटीक!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारताच्या 66 व्या प्रजासत्ताक दिनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिल्याने पाकिस्तान बिथरला आहे. भारत आणि अमेरिकेची वाढत चाललेली जवळीक पाकिस्तानला अजिबात रूचलेली नाही. खासकरून मोदी आणि ओबामांची जुळलेली केमिस्ट्री पाकिस्तानला फारच खटकली आहे. याचा अंदाज यावरून आपण लावू शकतो की एका चॅनेलने आपल्या बातम्यात खूपच खळबळजनक शब्दांचा वापर केला आहे.
पाकिस्तानी चॅनल ARY NEWS च्या एंकरने वाक्यप्रचाराचा वापर करीत पंतप्रधान मोदींना गाढव संबोधले. तसेच चॅनेलने मोदींना गुजरातचा खाटीक असे संबोधत अमेरिकेने घातलेल्या व्हिसा बंदीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एवढेच नव्हे तर अमेरिकेच्या जवळ जात असलेल्या भारताला व भारतातील नेत्यांना संधीसांधू असे म्हटले आहे.
ARY NEWS चॅनेलने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, 'अमेरिकेला मोदी कधीकाळी डोकेदुखी वाटत होती आज तेच लाडके वाटत आहेत. चॅनेलने पुढे म्हटले आहे की, 'गुजरातचा खाटीक असलेल्या नरेंद्र मोदींवर कधी अमेरिकेने बंदी घातली होती. मात्र, गरजेनुसार गाढवाला बाप बनविण्याचा जो वाक्यप्रचार आहे तो चुकीचा नाही हेच दिसून येते. 'विमानतळावरील नरेंद्र मोदी आणि ओबामा यांची गळाभेट खूप काही सांगून गेली. दिल्लीत ज्या पद्धतीने ओबामा यांचे स्वागत करण्यात आले त्यावरून हे दिसून येते की भारत अमेरिकेला मसका लावत आहेत. हिरवळीवर चर्चा, दोघांत गुफ्तगू, चहाचे घोट तेही मोदींनी बनवलेला चहा सर्व काही सांगत आहे असे वृत्तांत म्हटले आहे.
सुरक्षा परिषदेच्या स्थायी समितीचे सदस्यत्व देण्याच्या अमेरिकेच्या भूमिकेवर सवाल-
सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी समितीचे सदस्यत्त्व देण्याची भूमिका अमेरिकेने घेतल्यामुळे चॅनेलने सवाल उपस्थित केले आहेत. अमेरिकेने मोदींच्या विरोधातील खटले कायम का ठेवले होते व मोदींना अमेरिकेत का बंदी केली होती. मोदी पंतप्रधान बनले तर अमेरिका हे सहज विसरून कशी काय गेली असा सवाल अमेरिकेला विचारत पुढे म्हटले आहे की, अमेरिका अशा देशाला सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्यत्त्व देण्याबाबत वकिली करीत ज्या देशात मुस्लिमांसह ख्रिश्चन आणि इतर धर्मियांबाबत भेदभाव केला जातो. भारतात होत असलेले महिलांवरील अत्याचार पाहता व देशाची राजधानी दिल्लीला रेप कॅपिटल म्हणून हिणवत असलेल्या देशाला अशी महत्त्वाचे स्थान कसे काय दिले जावू शकते. सुरक्षा परिषदेचे सदस्यत्व देताना त्या देशाचे शेजारी राष्ट्रांशी संबंध कसे आहेत हे तापसले जाते. मात्र, भारताचे सीमेवर तणाव कायम असतो. चीन आणि बांग्लादेशसोबत भारताचे संबंध कसे आहेत या सर्वांनाच माहित आहे. अशावेळी मोदींच्या गळाभेटीचा काय परिणाम होतो हे पाहावे लागेल असे चॅनेलने म्हटले आहे.
पाकिस्तानला दुर्लक्षित करीत आहेत भारत-अमेरिका- रहमान मलिक
पीपीपीचे नेते रहमान मलिक यांचे वक्तव्यही ARY NEWS टीव्ही चॅनेलने दाखवले आहे. मलिकच्या माहितीनुसार, यापूर्वी जेव्हा ओबामा बातचित करीत होते तेव्हा दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेत असे. मात्र, आता पाकिस्तानला पूर्णपणे दुर्लक्षित केले आहे. रहमान यांनी चार आठवड्यापूर्वी ओबामांशी झालेल्या दहशतवादाप्रकरणी म्हटले आहे की, 'ओबामांना आम्ही सद्य स्थितीची माहिती देताना म्हटले होते की ते आणि मोदी यांनी पेशावरमध्ये यावे आणि पाकिस्तान कसा दहशतवाद्यांशी लढत आहे ते पाहावे. रहमान यांनी पुढे म्हटले आहे की, मोदी पहिल्यापासून पाकिस्तानला विरोधक मानत आले आहेत. ते कायम पाकविरोधी वक्तव्ये करीत आले आहेत यावेळी त्यांनी ओबामांनाही पाक विरोध पटवून सांगितला आहे.