आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistani Models Show Their Talent On Ramp In Delhi

दिल्लीत \'शान-ए पाकिस्तान\' टॅलेंट शोसाठी रॅम्पवर उतरल्या पाकिस्तानी मॉडेल्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर दोन्ही देशाच्या जवानांमध्ये जोरदार गोळीबार सुरु असताना दिल्लीत 'शान-ए पाकिस्तान' या फॅशन टॅलेंट शोचे आयोजन करण्यात आले आहे. 10 सप्टेंबरपासून 12 सप्टेंबरपर्यंत हा शो होणार आहे.
पाकिस्तानी डिझायनर अली जीशान, आसिफा आणि नबील, हुमा नासर, मोना इमरान, नादिया हुसेन, राणा नामान, रेमा कुरेशी, सनम आगा आणि आमिर बेग यांच्यासह भारताचे डिझायनर अंजू मोदी, पूनम भगत, राकेश अग्रवाल, आरशी जमाल, सदन पांडे, विकीसिंह आणि रशिमासिंह या फॅशन शोमध्ये मॉडेल्सच्या माध्यमातून सादरीकरण करणार आहेत.
या कार्यक्रमाचे क्युरेटर हुमा नासर यांनी सांगितले, की मला भारतात पाकिस्तानी कल्चर सादर करणे आवडते. मी आता माझ्या देशातून भारतासाठी बरेच काही आणले आहे. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी मदत केल्याने मी त्यांचा आभारी आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, पाकिस्तानी मॉडेल्सचा जलवा...