आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistani Mps Alleges Loksabha Speaker Overlooked Them

आमच्याकडे दुर्लक्ष केले; भारतात आलेल्या पाक खासदारांचा लोकसभा अध्यक्षांवर आरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- लोकसभेच्या सभागृहात कामकाज सुरु असताना व्हिजिटर्स गॅलरीत उपस्थित असलेले पाकिस्तानी खासदार)
नवी दिल्ली- भारत दौर्‍यावर आलेल्या 17 पाकिस्तानी खासदारांनी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्यावर दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. लोकसभेचे गुरुवारी कामकाज सुरु असताना ते व्हिजिटर्स गॅलरीत उपस्थित होते. 'आमच्याकडे कोणीच लक्ष दिले नाही. लोकसभा अध्यक्षा आमचे स्वागत करतील, भारतीय खासदारांशी आमची ओळख करून देतील', अशी आम्हाला अपेक्षा होती. मात्र, त्यांची आमच्याकडे दुर्लक्ष केल्याचे पाक खासदारांनी म्हटले आहे.
भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा हत्यारा असलेल्या नथुराम गोडसे याला देशभक्त म्हटल्याने विरोधकांनी गुरुवारी जोरदार गदारोळ केला होता. तेव्हा भारत दौर्‍यावर आलेल्या पाकिस्तानचे खासदार लोकसभेच्या व्हिजिटर्स गॅलरीत उपस्थित होते.

दुसरीकडे,भाजपच्या खासदार कीर्ति आझाद यांनी सांगितले की, पाकिस्तानी खासदारांसाठी वेळ निश्चित करण्यात आला होता. मात्र, ते वेळेत सभागृहात पोहोचले नाहीत. या लोकसभा अध्यक्षाची कोणतीही चूक नाही. तसेच पाकिस्तानचे खासदार व्हिजिटर्स गॅलरीत उपस्थित होते, याची आपल्याला माहिती नसल्याचे लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी म्हटले आहे.
दरम्यान, 'पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ लेजिसलेटिव्ह डेव्हलपमेंट एंड ट्रान्सपेरेंसी'द्वारा पाकिस्तानच्या 17 खासदारांचा एक चमू भारत दौर्‍यावर आला आहे. लोकशाही पद्धतीत देशाचे कामकाज कसे चालते, याचा अभ्यास करण्यासाठी पाक खासदार दोन दिवसांसाठी भारत दौर्‍यावर आले आहेत.