आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Pakistani Scintist Abdul Qadeer Khan Slams Nawaj Sharif On India\'s Mars Mission Success

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाक शास्त्रज्ञाची नवाज शरीफांवर आगपाखड, म्हणाले - आमच्यापुढे \'बच्चा\' होता भारत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारताच्या मंगळ मोहिम यशानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पूर आला आहे. इस्त्रोने मिशन यशस्वी झाल्याचे जाहीर केल्यानंतर ट्विटरवर #Mangalyaan, #IndiaAtMars, #MarsMission, #Indians, #Jai Hind, #Martian ट्रेंड करत आहे. जगभरातून भारतावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यात पाकिस्तानातील अणू कार्यकर्माचे जनक अब्दूल कादिर खान यांनी ट्विट करुन म्हटले आहे, की आज भारत मेट्रो प्रोजेक्टच्या 7 पटीने कमी खर्चात मंगळावर पोहोचले आहे. आणि आमचे पंतप्रधान नवाज शरीफ करदात्यांच्या पैशावर अमेरिकेच्या दौर्‍यावर आहेत आणि रोज एक लाख डॉलर (जवळपास 60 लाख रुपये) खर्च करत आहेत. खान यांनी भारतावर आगपाखड करताना म्हटले आहे, 'तंत्रज्ञानामध्ये कधीकाळी भारत पाकिस्तानसमोर 'बच्चा' होता. पाकिस्तानच्या भ्रष्ट सरकारने वैज्ञानिकांना तुरुंगात टाकले आणि अमेरिकेच्या सांगण्यावरुन संशोधन बंद करुन टाकले.'
मंगळ मिशनचे ट्विटर अकाउंट लॉन्च
भारताच्या मंगळ मोहिमेच्या यशानंतर उत्साहित झालेल्या इस्त्रोने बुधवारी त्याचे ट्विटर अकाउंट लॉन्च केले. @MarsOrbiter या नावाने हे अकाउंट तयार करण्यात आले आहे.
राहुल गांधींनी दिल्या शुभेच्छा
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी इस्त्रोच्या संशोधकांना शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले, हा ऐतिहासिक दिवस आहे. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात मंगळाच्या कक्षेत पोहचणारा देश अशी आपली ओळख निर्माण करुन दिली आहे. मंगळयान टीमला या अतुलनीय कामगिरीसाठी शुभेच्छा.
दिग्विजयसिंहांनी साधला निशाणा
इस्त्रोच्या यशाबद्दल अमेरिकेची अतंराळ संशोधन संस्था नासापासून राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहाण आप नेते अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरवर शुभेच्छा दिल्या आहेत.
काँग्रेस महासचिव दिग्विजयसिंह यांनीही मंगळयाना बद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. त्यासोबतच त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, 'आताही मोदी ही त्यांच्या 100 दिवसांची कामगिरी आहे, असे मानतात का ?'
पुढील स्लाइडवर पाहा, ट्विटरवर युजर्सनी काय - काय शेअर केले...