आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईदनिमित्त भारताने पाठवलेली मिठाई पाकने नाकारली, पुंछमध्ये पुन्हा गोळीबार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- वाघा बॉर्डरवर तैनात सीमा सुरक्षा दलच्या (बीएसएफ) जवानांनी रमजान ईदनिमित्त दिलेली मिठाई पाकिस्तानी जवानांनी परत पाठवल्याची माहिती समोर आली आहे. त्याबरोबर पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्‍यात आले आहे. जम्मू-काश्मीरमधील पुंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानी जवानांनी गोळीबार केला आहे. दुसरीकडे, बांगलादेशच्या जवानांनी भारताच्या ईदच्या शुभेच्छा आणि मिठाई स्विकारली आहे.

जम्मू तसेच पंजाबमधील अमृतसरमधील अटारी-वाघा सीमेवर भारतीय जवान सणनिमित्त पाकिस्तानी जवानांनी मिठाई भेट देत असतात. परंपरेप्रमाणे यंदाही बीएसएफने ईदनिमित्त पाकिस्तानी जवानांना मिठाई देऊन शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र, पाकिस्तानी रेंजर्सनी मिठाई न स्विकारता परत पाठवल्याचे बीएसएफचे उप महानिरीक्षक एम.एफ फारूकी सांगितले आहे.
बातम्या आणखी आहेत...