आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातमध्ये घुसलेले 10 पैकी 3 दहशतवादी मारले, PAKने प्रथमच दिला इशारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एनएसजी कमांडोच्या चार टीम गुजरातमध्ये दाखल झाल्या आहेत. (फाइल फोटो) - Divya Marathi
एनएसजी कमांडोच्या चार टीम गुजरातमध्ये दाखल झाल्या आहेत. (फाइल फोटो)
नवी दिल्ली/अहमदाबाद - समुद्रमार्गे गुजरातमध्ये घुसलेल्या 10 पाकिस्तानी दहशतवाद्यांपैकी तिघांना सुरक्षा रक्षकांनी ठार केले आहे. मंगळवारी सरकारी सूत्रांच्या हवाल्याने माध्यमांनी हे वृत्त दिले. मात्र, हे ऑपरेशन कुठे झाले आणि दहशतवाद्यांना कसे मारले हे सांगण्यात आलेले नाही.

सर्च ऑपरेशन सुरु
- सूत्रांच्या माहितीनूसार, या तीन दहशतवाद्यांना शुक्रवारी मारण्यात आले.
- उर्वरीत 7 जणांचा शोध सुरु आहे. सुरक्षा यंत्रणा त्यांच्याबद्दलची माहिती देण्यास नकार देत आहे.
- हे लष्कर आणि जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी आहेत. त्यांचे लक्ष्य शिवरात्रीला सोमनाथ मंदिरावर हल्ला करणे होते.
- मात्र पाकिस्तानकडून मिळालेल्या अलर्टनंतर हा संभावित हल्ला टाळण्यात भारतीय यंत्रणांना यश आले.
- सूत्रांचे म्हणणे आहे, की मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यासारखीच याची मोडस ऑपरेंटी असणार होती.

पाकिस्तानने प्रथमच भारताला केले अलर्ट
- 6 मार्चला पाकिस्तानचे एनएसए नासिर खान जंजुआ यांनी भारताचे एनएसए अजित डोभाल यांना संभावित हल्ल्याची माहिती दिली होती.
- भारत-पाकच्या इतिहासातिल ही पहिली घटना आहे, की उभय देशांच्या इंटीलिजन्सने इनपूट शेअर केले.
- भारताला हल्ल्याचा इशारा मिळाल्यानंतर एनएसजीच्या 4 टीम गुजरातमध्ये पोहोचल्या.
- गुजरातचे पोलिस महासंचालक पी.सी. ठाकूर म्हणाले, 'एनएसजीचे चार पथक पोहोचले आहे. तीन टीम अहमदाबादमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. एक टीम सोमनाथ मंदिराबाहेर ठेवण्यात आली आहे.'
- अलर्टनंतर गुजरात पोलिसांना सतर्कतेचा आदेश देण्यात आला. पोलिसांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या होत्या.

समुद्रात बोट सापडली होती, एनआरआयला अटक
- गुप्तचर विभागाच्या (आयबी) इनपुटमध्ये म्हटले होते, की पाकिस्तानकडून एक बोट आली, त्यामध्ये 8 -10 दहशतवादी असून गुजरातमध्ये घुसण्याचा प्रयत्न आहे.
- ते केव्हाही हल्ला करु शकतात. त्यानंतर गृहमंत्रालयाचे अतिरिक्त गृह सचिव पी.के. तनेजा यांनी पोलिस-आयबी अधिकाऱ्यांसोबत तत्काळ बैठक बोलावली होती.
- त्याचवेळी पोरबंदरमध्ये एका एनआरआयला अटक केली गेली होती.
- दुसरीकडे, पश्चिम सीमेवरील अखेरच्या टोकावर कोटेश्वर जवळ एक बेवारस मृतदेह सापडला. वास्तविक त्यात काहीही अक्षेपार्ह्य दिसले नाही.
पुढील स्लाइडमध्ये,
>> गुजरातमध्ये हाय अलर्ट
>> सोमनाथ मंदिरात NSG
बातम्या आणखी आहेत...