आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यकृताच्या उपचारासाठी पाक महिलेस व्हिसा; स्वराज यांचे आणखी एक मानवतावादी पाऊल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- पाकिस्तानातील एका महिलेस भारतातील अद्ययावत रुग्णालयात यकृतासंबंधी उपचार करता येणार आहेत. त्यासाठी त्यांना व्हिसा दिला जाणार आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी इस्लामाबादमधील उच्चायुक्तांना यासंबंधीचे आदेश दिले आहेत.


पाकिस्तानमधील अनेक लहान मुलांवर भारतात उपचाराची परवानगी दिल्याच्या पार्श्वभूमीवर सुषमा स्वराज यांनी हे आणखी एक मानवतावादी पाऊल उचलले आहे. सादिया नावाच्या पाकिस्तानातील एका तरुणीने आजारी आईच्या उपचारासाठी भारताकडे मदतीसाठी आर्जव केले होते. त्याला सुषमा यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आम्ही निश्चितपणे मदतीसाठी तयार आहोत, असे स्पष्ट करत सदर मुलीला दिलासा दिला. त्यासंदर्भात इस्लामाबाद येथील उच्चायुक्त कार्यालयाला सूचना देण्यात आल्या आहेत. स्वराज यांनी ट्विट करून त्या मुलीशी संवाद साधला. नासीर मेहमूद अहमद नावाच्या अन्य एका पाकिस्तानी नागरिकाने उपचारासाठी मेडिकल व्हिसाची मागणी केली आहे. त्यांच्या कागदपत्रांची उच्चायुक्त पडताळणी करत आहेत.

त्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल. मला भारतात यकृत तसेच मूत्रपिंडावरील प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करायची आहे. त्यासाठी परवानगीची अहमदने विनंती केली होती.

 

वैद्यकीय उपचारासाठी उदारमतवादी धोरण
सीमेपलीकडून पाकिस्तानने दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे. दहशतवादी हल्ल्यांत अनेक भारतीयांना प्राण गमवावे लागत आहेत. हिंसाचार थांबलेला नाही. परंतु दाेन्ही देशांतील संबंध सुधारण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने वारंवार सकारात्मक भूमिका घेतली आहे. वैद्यकीय उपचारांची गरज असलेल्या रुग्णांबाबत भारताने उदारमतवादी धोरणाचा वारंवार प्रत्यय आणून दिला आहे. केवळ ट्विटवरील विनंतीनंतर परराष्ट्र मंत्रालय वेगाने मदत पुरवते.

बातम्या आणखी आहेत...