नवी दिल्ली - पाकिस्तानी पत्रकार व लेखिका आणि भारताचे माजी केंद्रीय मंत्री शशी थरुर यांची मैत्रिण मेहर तरारचे पुस्तक पुढील महिन्यात प्रकाशित होत आहे. या पुस्तकात तरार यांनी लिहिले आहे, की शशी हे सुंदर आणि आकर्षित करणाऱ्या आवाजाचे धनी आहेत. शशी थरुर यांची पत्नी
सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूनंतर मीडियाने मला नाहक बदनाम केले, असेही मेहर यांनी लिहिले आहे. त्यांनी या पुस्तकात स्पष्ट केले आहे की थरुर आणि माझ्यात फार जवळीक नव्हती.
प्रथमच बोलल्या मेहर
‘Leaves from Lahore’ हे मेहर तरार यांचे 294 पृष्ठांचे पुस्तक पुढील महिन्यात प्रकाशित होणार आहे. त्यात त्यांनी लिहिले आहे, 'शशी थरुर यांची पत्नी सुनंदा यांच्या मृत्यूनंतर दोन्ही देशांच्या मीडियाने माझ्याबद्दल चुकीची माहिती दिली. जेव्हा तुमचे वैयक्तीक आयुष्य ब्रेकिंग न्यूज बनते, अर्धवट माहितीच्या आधारे बातम्या प्रसिद्ध होतात आणि संबंध नसलेले लोक त्यावर टीव्हीवर चर्चा झाडतात तेव्हा तुम्हाला नाईलाजाने शांत राहावे लागेत.' लाहोरच्या रहिवासी असलेल्या मेहर तरार यांनी पुस्तकात त्यांचे आयुष्य, प्रेम, क्रिकेट, राजकारण, दहशतवाद आणि बॉलिवूड यासंबंधी लिहिले आहे.
क्लिंटन - मोनिकाशी तुलना
सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूनंतर शशी थरुर यांच्यासोबतच्या संबंधाबद्दल मेहर यांनी लिहिले,'जेव्हा मीडियाला आमच्या संबंधामध्ये आणि सुनंदच्या स्टोरीमध्ये काही सापडले नाही तेव्हा त्यांनी या प्रकरणाला क्लिंटन-मोनिका आणि सरकोजी-ब्रुनी सारखे दाखवण्याचा प्रयत्न केला. पत्रकारितेच्या तत्वांना तिलांजली दिली गेली. एखाद्या स्कँडल प्रमाणे दाखवण्याचा प्रयत्न झाला. संबंध नसलेले अनोळखी लोक आमच्या आयुष्यावर टीका-टिप्पणी करत होते. त्या प्रसंगी मला शांत राहाणेच योग्य वाटले.'
सुनंदाचा उल्लेख टाळला
विशेष म्हणजे महेर तरार यांच्या पुस्तकात सुनंदा पुष्कर यांच्या नावाचा कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाही. पुस्तकाबद्दल एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या, 'मी कधीही सुनंदाला भेटले नाही किंवा तिच्यासोबत कधी बोलले नाही. मला आश्चर्य तेव्हा वाटले जेव्हा सुनंदाचे इमेल मिळाले.' पुस्तकात थरुर यांचा उल्लेख मात्र रसाळवाणीचे असा करण्यात आला आहे. ते मित्र असल्याचेही मेहरने नाकारलेले नाही. मात्र ही आता जूनी गोष्ट झाली, असे त्यांनी पुस्तकात म्हटले आहे. सुनंदा यांच्या मृत्यूशी दुरान्वयानेही संबंध नसल्याचे म्हटले आहे. मेहरने म्हटले आहे, की सुनंदाच्या मृत्यूनंतर थरुर यांच्यासोबत फक्त दोनवेळा संपर्क झाला, तोही मॅसेजच्या माध्यमातून. एकदा त्यांची आजी वारली तेव्हा आणि दुसऱ्यांदा त्यांच्या मुलाचे लग्न झाले तेव्हा. माझ्या मॅसेजला त्यांनी धन्यवाद असे उत्तर दिले होते.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, माजी केंद्रीय मंत्री शशी थरुर आणि सुनंदा पुष्कर यांची निवडक फोटोज...