आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistans Flag Waived, Masrat Alam Arrested In Home Prison News In Marathi

पाकिस्तानचा झेंडा फडकावणारा फुटीरवादी नेता मसरत आलमला अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/इस्लामाबाद- श्रीनगरममध्ये रॅली काढूत पाकिस्तानचा झंडा फडकावून भारताविरोधात घोषणाबाजी करणार्‍या फुटीरवादी नेता मसरत आलम याला अखेर आज (शुक्रवारी) सकाळी पोलिसांनी अटक केले. मसरत आलम, सय्यद अली शाह गिलानी, मीरवाइज उमर फारूक आणि शब्बीर शाहसह सहा फुटीरतावादी नेत्यांना अटक करण्यापूर्वी गुरुवारी रात्री नजरकैदेत ठेवण्यात आले होते.

सर्व फुटीरवादी नेते शुक्रवारी पुलवामा जिल्ह्यातील त्रालमध्ये सभा घेणार होते. मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या आदेशानंतर पोलिसांनी सभेची परवानगी रद्द करून ही कारवाई केली.
तत्पूर्वी, मसरतसह हुरियत नेत्यांनी निदर्शने करताना पाकचा झेंडा फडकावल्यानंतर केंद्राने सईद सरकारला चांगलीच तंबी दिली. यानंतर सईद सरकारने मसरत आलम, गिलानी, मीरवाइज फारूक आणि इतर फुटीरवाद्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पक्ष या कारवाईमुळे घाबरणार नाही, अशी टिप्पणी करत हुरियत कॉन्फरन्सने या कारवाईला विरोध केला. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी बुधवारी रात्रीच मुख्यमंत्री सईद यांना या फुटीरवाद्यांवर कारवाई करण्यास सांगितले होते. जम्मू-काश्मीर भाजपनेही मसरत आणि गिलानी यांना अटक करण्याची मागणी केली होती. यावर मसरतने गुरुवारी ‘पाकिस्तानी ध्वज फडकवण्यात काहीच गैर नाही. असे 1947 पासून घडत आहे,’ असे राष्ट्रद्रोही वक्तव्य केल्याने पोलिसांनी त्याला रात्री नजरकैद केले होते.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, मसरतच्या पुतळ्याचे झाले दहन, राज्यात उग्र निदर्शने