आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तामिळी शेतकऱ्यांच्या मूत्रप्राशन आंदोलनाची अखेर दखल; मोदींना भेटणार सीएम पलानीस्वामी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तामिळी शेतकऱ्यांची अखेर तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांची विचारपूस केली. - Divya Marathi
तामिळी शेतकऱ्यांची अखेर तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांची विचारपूस केली.
नवी दिल्ली- दिल्लीतील जंतरमंतरवर कर्जमाफीसाठी मूत्रप्राशान करून सरकारचा निषेध करणाऱ्या तामिळी शेतकऱ्यांची अखेर तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांची विचारपूस केली. तसेच हे आंदोलन तात्काळ थांबवण्याचे आवाहन केले. पलानीस्वामी या शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. 
 
गेल्या महिनाभरापासून आंदोलन करणार्‍या तमिळनाडूच्या शेतकर्‍यांच्या संयमाचा बांध शनिवारी फुटला. या शेतकर्‍यांनी शनिवारी मूत्रप्राशन करून सत्ताधारी मोदी सरकारचा निषेध केला. तसेच मागणी पूर्ण न झाल्यास रविवारी मानवी मैला खाण्याचा इशारा सुद्धा दिला शेतकर्‍यांनी यापूर्वी पीएमओसमोर विवस्त्र होऊनही आंदोलन केले होते. सरकारने त्यांचे कर्ज माफ करावे, अशी त्यांची मागणी आहे.
 
यापूर्वी कवटी हातात घेऊन केले आंदोलन...
- आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांमध्ये अनेक महिलांचा समावेश आहे. पंतप्रधानांचे लक्ष वेधून घेण्यासाठी आतापर्यंत त्यांनी अनेक मार्गांनी आंदोलन केले आहे. पण, मोदी सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याचे शेतकर्‍यांनी म्हटले आहे.
- या आधी आंदोलक शेतकर्‍यांनी चारा खाऊन आणि साड्या नेसून आंदोलन केले होते. इतकेच नाही तर आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या कवटी हातात घेऊन आंदोलन केले होते.
- आस्मानी संकटामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्यावी तसेच त्यांचे कर्जही माफ करावे.
- तमिळनाडू सरकारनेही शेतकर्‍यांची कर्जमाफीसाठी केंद्र सरकारकडे 40 हजार कोटी रुपयांचा निधी मागितला आहे. दरम्यान, केंद्राने त्यापैकी 1700 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून शेतकर्‍यांची थट्टा केली आहे.
 
पुढील स्लाईड्समध्ये पाहा शेतकऱ्यांनी यापूर्वी उंदिरे खाऊन... आत्महत्या केलेल्या सहकारी शेतकऱ्यांच्या कवट्या गळ्यात घालून... अर्धवट मुंडन करून आणि मूत्रप्रशान करून केला सरकारचा निषेध...
 
 
बातम्या आणखी आहेत...