आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Panagariya First Vice president Of Niti Commission

नव्या नीती आयोगाचे उपाध्यक्ष पनगढिया

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - केंद्र सरकारने प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ अरविंद पनगढिया यांची नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. त्यांना कॅबिनेट दर्जा असेल. अर्थशास्त्रज्ञ विवेक देवरॉय आणि डीआरडीओचे माजी प्रमुख व्ही. के. सारस्वत हे नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य, गृहमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री अरुण जेटली, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू व कृषिमंत्री राधामोहन सिंह हे पदसिद्ध सदस्य तर भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी व सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत हे विशेष निमंत्रित असतील. ६२ वर्षीय पनगढिया हे गुजरात मॉडेलचे समर्थक असून कोलंबिया विद्यापीठात ते प्रोफेसर आहेत. आयएमएफ व जागतिक बँकेवर त्यांनी काम केले आहे.