आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निठारी नरसंहार : पंढेर-कोली यांना नवव्या खटल्यात मृत्यूदंड, मोलकरीण बलात्कार-हत्या प्रकरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाईल फोटो) - Divya Marathi
(फाईल फोटो)

गाझियाबाद - सीबीआयच्या विशेष न्यायालयाने शुक्रवारी गाझियाबादमध्ये मनिंदर सिंह पंढेर आणि त्याचा नोकर सुरेंद्र कोली यांना आणखी एका प्रकरणात मृत्यूदंडाची शिक्षा सुानवली. मोलकरीण अंजलीच्या बलात्कार आणि खून प्रकरणात या दोघांना ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे. पंढेर आणि कोली या दोघांचाही 2006 मध्ये झालेल्या या बलात्कार आणी खून प्रकरणात समावेश होता, त्यामुळे त्यांना मृत्यूदंडासारखी कठोर शिक्षाच व्हायला हवी असे कोर्टाने म्हटले आहे. 

 

निर्घृणपणाचा कळस.. 

पंढेर आणि कोली दोघेही या प्रकरणात सारखेच दोषी आहेत. त्यामुळे त्यांना कायद्यानुसार सर्वाधिक शिक्षा देणे गरजेचे होते. ही शिक्षा म्हणजे फाशी असल्याचे कोर्ट म्हणाले. कोलीने मोलकरणीला ओढत घरामध्ये आणले आणि तिला बेशुद्ध केले. त्यानंतर दोघांनी तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर तिची हत्या करून तिचे मांसदेखिल खाल्ले असेही कोर्टाने सांगितले. या निर्घृणपणानंतर त्या दोघांना फाशीची शिक्षा देणे हा एकच पर्याय होता, असेही कोर्टाने म्हटले. 


गुरुवारी या दोघांनी दोषी ठरवण्यात आले होते. त्यांच्यावर कलम 376 (बलात्कार), 302 (खून) आणि 201 (पुरावे नष्ट करणे) या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पंढेर आणि कोली हे अनेक लहान मुलांच्या लैंगिक शोषण आणि हत्या प्रकरणातील आरोपी आहेत. सीबीआयने पंढेरच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले नव्हते. पण कोर्टाने त्याला समन्स पाठवले होते. 

 

पुढे वाचा, काय होते प्रकरण...किती खटले आहेत आणि यापूर्वीच्या खटल्यांतील शिक्षा..

 

 

बातम्या आणखी आहेत...