आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पंडित नेहरूंचे निवडक PHOTOS, ज्यामुळे निर्माण होतो वाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज (27 मे, बुधवार) देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची 51वी पुण्यतिथी आहे. या निमित्ताने आज आम्ही तुम्हाला पंडित नेहरूंच्या काही वादग्रस्त फोटोसंदर्भात माहिती देत आहोत. हे फोटो गुजरातमधील महिला फोटोजर्नलिस्ट होमाई व्यारावाला यांनी काढले आहेत.

देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे शिक्षण परदेशात झाले. जवाहरलाल नेहरूंचे वडील पंडित मोतीलाल नेहरू हे देशातील प्रसिद्ध व्यक्तींमधील एक होते. असे म्हणतात की, मोतीलाल नेहरू आणि जवाहरलाल नेहरूंचे कपडे धुण्यासाठी परदेशात पाठवले जात होते. त्यांचे शिक्षण परदेशातच झाले. त्यांनी आपे शालेय शिक्षण हॅरो आणि कॉलेजच शिक्षण ट्रिनीटी कॉलेज लंडन येथे पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी लॉ डिग्री कॅम्ब्रिज विद्यापीठातून घेतली. लहानपणापासूनच परेशात राहिल्यामुळे नेहरू तेथील संस्कृतीमध्ये रमले होते. इंग्रजांच्या शासन काळात आणि देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांचे अनेक मित्र त्यांना भेटण्यासाठी भारतात येत होते. पंडित नेहरू त्यांच्या मित्रांचे स्वागत विदेशी तसेच भारतीय संस्कृतीनुसार करत होते. यामध्ये त्यांच्या अनेक विदेशी मैत्रिणीसुद्धा होत्या.

का होतो वाद -
नेहरूंच्या दुर्लभ फोटोंमध्ये सर्वात जास्त वाद त्याकाळातील व्हाईसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांची पत्नी एडविना माउंटबेटनसोबत धुम्रपान करताना काढलेल्या फोटोमुळे होतो.
महिला फोटोजर्नलिस्टने काढला होता फोटो -
भारताच्या स्वातंत्र्य समराच्या वेळी देशातील पहिली फोटोजर्नलिस्ट महिला होमाई व्यारावाला यांनी नेहरू यांची काही दुर्लभ छायाचित्रे घेतली होती. मुळची गुजराती असलेल्या व्यारावाला यांचे 15 जानेवारी 2012 रोजी बडोद्यात निधन झाले. परंतु, त्यांनी काढलेली छायाचित्रे आजही अजरामर झाली आहेत. त्यांनी ब्रिटिश हाऊस कमिशनरसोबत धूम्रपान करतानाचा नेहरू यांचा फोटो काढला होता.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा, पंडित नेहरूंचे काही दुलर्भ फोटो...
बातम्या आणखी आहेत...