आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्थिक वर्ष 1 जानेवारीपासून सुरू करण्याचा केंद्राचा प्रस्ताव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आर्थिक वर्ष एप्रिल ते मार्चऐवजी जानेवारी ते डिसेंबर करण्याची शिफारस करणाऱ्या समितीच्या अहवालावर केंद्र सरकार विचार करत आहे. मात्र आताच काही सांगणे घाईचे ठरेल, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले. 

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शुक्रवारी लोकसभेत सांगितले की, समितीचा अहवाल मिळाला आहे, हे खरे आहे. जेव्हा असे अहवाल मिळतात, त्याच्या शिफारशींचा केवळ केंद्र राज्य सरकारच्याच नव्हे तर स्थानिक स्वराज संस्थांच्या कामकाजावरही परिणाम होतो. त्यामुळे व्यापक दृष्टिकोन आणि दूरदृष्टीने विचार करावा लागतो. तत्पूर्वी जेटली म्हणाले की, जगातील प्रत्येक देश आपल्या परिस्थितीनुसार आर्थिक वर्ष निश्चित करत असतो. इंग्रजांच्या जुन्या व्यवस्थेत एप्रिलपासून आर्थिक वर्ष सुरू करण्यात आले होते. भारताच्या शेती हवामानाला अनुरूप जानेवारीपासून आर्थिक वर्ष सुरू करावे, असा युक्तिवाद केला जातो. याबाबत आधीही अभ्यास झालेला आहे. असे आर्थिक वर्ष सुरू करायचे झाल्यास राज्यघटनेत कोणतीही दुरुस्ती करण्याची गरज नाही. कारण हा प्रशासकीय धोरणात्मक प्रश्न आहे, असे त्यांनी सांगितले. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...