आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Panel Wants Age Of Juveniles To Be Fixed At 16 Years

गुन्हेगारांना 16 वर्षांच्या वयापर्यंत किशोर ठरवा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - महिलांवरील वाढते अत्याचार पाहता गुन्हेगारांना 16 वर्षे वयापर्यंतच किशोर मानले जावे, अशी शिफारस संसदेच्या एका समितीने केली आहे. त्यांच्या महिलांसंबंधी गुन्हय़ांवर देशातील विविध कायद्यांन्वये खटला चालावा यासाठी ही शिफारस आहे. सध्या ही वयोर्मयादा 18 वर्षे आहे.

महिला सबलीकरणावरील समितीने कठोर पावले उचलण्याचे आवाहन सरकारला केले. समितीनुसार 2010 मध्ये किशोरवयीनांनी 22,740 शिक्षापात्र गुन्हे केले. यंदा हा आकडा 10.5 टक्क्यांनी वाढून 25,125 झाला. ‘लैंगिक दुराचार तथा देहव्यापार पीडित आणि त्यांचे पुनर्वसन’ या मथळय़ाखाली हा अहवाल आहे.

2000मध्ये कायदा बदलला
किशोर न्याय कायदा, 1986 नुसार 16 वर्षांखालील मुले आणि 18 वर्षांखालील मुलींना किशोर मानण्यात आले. 2000 मध्ये यात दुरुस्ती झाली. मुले व मुलींची वयोर्मयादा समान म्हणजे 18 वर्षे केली गेली.