आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पानमसाल्यासह पाऊचमध्ये तंबाखू विकण्यासही बंदी, सर्वोच्च न्यायालयाने कंपन्यांना फटकारले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - गुटख्यावरबंदी असताना यापासून बचावासाठी काही कंपन्यांनी पानमसाला तंबाखू वेगवेगळ्या पाऊचमध्ये विकण्यास प्रारंभ करून गुटखा विक्रीसाठी नवी पद्धत अवलंबली आहे. यावर सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेत सर्वच प्रकारच्या तंबाखू सेवनावर अर्थात निकोटिनवरच बंदी घालण्यात आल्याचे म्हटले आहे. शिवाय संबंधितांनी ही बंदी सक्तीने लागू करावी, असे आदेशही दिले.
न्यायमूर्ती व्ही. गोपाल गौडा आणि न्या. आदर्श के. गोयल यांच्या न्यायपीठाने तंबाखूवरील बंदीबाबत सुनावणी करताना म्हटले आहे की, तंबाखू आणि निकोटिनयुक्त पानमसाला तसेच गुटखा निर्मिती विक्रीवर बंदी असल्याचे सांगून या बंदीची तातडीने अंमलबजावणी करावी, असे आदेश दिले.
कंपन्यांचाफंडा : सन२०११ मध्ये गुटख्यावर बंदी घालण्यात आली होती. यानंतर बहुतांश कंपन्यांनी यावर तोडगा काढत तंबाखूरहित पानमसाला आणि तंबाखू वेगवेगळ्या पाऊचमध्ये विकायला सुरुवात केली होती.
व्यसनी लोकांचेही फावले. हे दोन्ही एकत्र करून लोक गुटख्यासारखाच आस्वाद घेऊ लागले. ज्येष्ठ वकील गोपाल सुब्रह्मण्यम यांनी ही बाब सर्वोच्च न्यायालयासमोर मांडली होती.

भारतात ३५ टक्के वयस्करांना तंबाखूचे व्यसन
गोल्डन अॅडल्ट टोबॅको सर्व्हे-२०१० नुसार भारतात सुमारे ३५ टक्के वयस्कर लोक तंबाखूचे सेवनक रतात. ही संख्या सुमारे २७.५ कोटी आहे. यातील १६.३७ टक्के लोक तंबाखू चघळतात तर ६.९ कोटी लोक िवडी-सिगारेटच्या अधीन आहेत. ४.३ टक्के लोक या दोन्हीचाही वापर करतात.
बातम्या आणखी आहेत...