आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतंजलीची उलाढाल 5 हजार कोटी रुपयांवरुन 10 हजार कोटी, एका वर्षातच दुपटीने वाढ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली- रामदेव बाबा यांच्‍या पंतजलीची वार्षिक उलाढाल एका वर्षात दुपटीने वाढली आहे. 2015-16 मध्‍ये  पंतजलीची 5000 कोटी रुपये एवढी उलाढाल होती, 2016-17 मध्‍ये ती 10,651 कोटी रुपये एवढी झाली आहे. कंपनीने  केवळ घरगूती वापराच्‍या तेलाच्‍या विक्रीतून 1467 कोटी रुपये व टुथपेस्‍टद्वारे 940 कोटी रुपयांची कमाई केली आहे. हरिद्वार येथे पतंजली ब्रँडच्‍या वार्षिक पत्रकार परिषदेत रामदेव बाबा यांनी ही माहिती दिली. 
 
2 वर्षांत पतंजली बनणार देशातील सर्वात मोठा स्‍वदेशी ब्रँड: रामदेव बाबा
- पतंजलीच्‍या नफ्यात तब्‍ब्‍ल 100 टक्‍क्‍यांनी वाढ झाल्‍याचे रामदेव बाबा यांनी यावेळी सांगितले. 
- देशात पतंजली हा स्‍वदेशी ब्रँड वेगाने वाढत असून येत्‍या 2 वर्षांत देशातील हा सर्वात मोठा स्‍वदेशी ब्रँड बनेल, असा आशावादही रामदेव बाबा यांनी व्‍यक्‍त केला. 
- यावेळी त्‍यांनी पतंजलीच्‍या उत्‍पादनांविषयी माहिती दिली व भविष्‍यातील काही योजनाही सांगितल्‍या. 
- 2017मध्‍ये हेअर ऑईलने पतंजलीला 825 कोटी रुपयांचा महसूल मिळवून दिला. पतंजलीच्‍या विविध उत्‍पादनांच्‍या मार्केट शेअरमध्‍येही वाढ झाल्‍याचे त्‍यांनी सांगितले. 
- सध्‍या पतंजली शॅम्‍पूचा मार्केट शेअर 15 टक्‍के, टुथपेस्‍टचा 14 टक्‍के, फेसवॉशचा 15 टक्‍के, डिशवॉशचा 35 टक्‍के आणि मधाचा 50 टक्‍के असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. 

वर्षाला 30-40 हजार कोटी रुपयांची उत्‍पादने
- वर्षभरात 30 ते 40 हजार कोटी रुपयांची उत्‍पादने निर्माण करण्‍याची पतंजलीची क्षमता आहे. पुढच्‍या वर्षी ही क्षमता 60 हजार कोटी रुपयांपर्यत वाढवण्‍यात येईल असे रामदेव बाबा यांनी सांगितले.
- पतंजलीच्‍या काही उत्‍पादनांबाबत जाणिवपूर्वक गैरसमज पसरवल्‍या जातात, असेही रामदेव बाबा यावेळी म्‍हणाले. पतंजलीच्या प्रत्येक औषधात गोमूत्र असल्याची खोटी माहिती मुसलमानांमध्ये पसरवली जात आहे. आम्ही गोमूत्र लपवून विकत नाही. लोकांचा विश्वास हीच आमची ताकद आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
 
शहीदांच्या मुलांसाठी सुरु करणार सैनिक शाळा 
-  शहीदांच्‍या मुलांसाठी पतंजलीतर्फे  निवासी सैनिक शाळा सुरु करण्‍यात येईल. 1000 मुलांसाठी ही शाळा असणार असून त्‍यासाठी त्‍यांच्‍याकडून कोणतेही शूल्‍क आकारले जाणार नाही, अशी माहिती रामदेव बाबा यांनी यावेळी दिली.
- सुकमा नक्षलवादी हल्‍ल्‍यातील शहीदांच्‍या कुटुंबियांसाठी 2 लाख रुपये देण्‍याची घोषणा यावेळी रामदेव बाबा यांनी केली. 
 
पुढील स्‍लाइडवर वाचा, 6 वर्षांत अशी झाली पंतजलीच्‍या कमाइत वाढ...
 
 
बातम्या आणखी आहेत...