आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: इंडियन ARNOLD, कँसर आणि लकवा मारल्यानंतरही बनला मिस्टर इंडिया

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - 'मंजिल उन्हीं को मिलती है, जिनके सपनों में जान होती है। पंख से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है।' या ओळींना अगदी सार्थ ठरवते भारतीय बॉडीबिल्डर आनंद अर्नोल्डची जीवनगाथा. भारतीय अर्नोल्ड नावाने प्रसिध्द असलेल्या आनंदच्या शरीराला कँसरमुळे लकवा मारला होता. त्यानंतरसुध्दा आनंदने आत्मविश्वास न गमावता, खचून न जाता आनंदने स्वतःला सिध्द केले. तसेच जे काही लोक आनंदच्या ध्येयाबद्दल साशंक होते त्यांना चुकीचे ठरवत, त्याने तीन वेळा मिस्टर इंडियाचा खिताब मिळवला.

28 वर्षांचा आनंदने नुकतेच एका मुलाखतीत आपल्या संघर्षपूर्ण प्रवासाबद्दल मनमोकळ्या गप्पा मारल्या. आनंदने सांगितले की, कसे त्याला वयाच्या 15 व्या वर्षी कँसर झाला, त्यानंतर त्याला लकवासुध्दा मारला. तरीही शरीराची अशी अवस्था असतानाही मी बॉडीबिल्डिंगचे अनेक मेडल जिंकले. आनंद सांगतो की,"मला लहानपणापासूनच बॉडीबिल्डर बनायचे होते. मी माझ्या करिअरची पहिली ट्रॉफी वयाच्या 13 वर्षी जिंकली होती"

15 व्या वर्षी कँसरने ग्रासले
आनंदला त्याचे बॉडीबिल्डींगचे करिअर सुरू करून अवघे दोनच वर्ष झाले होते, तोच त्याला आपल्या शरीराच्या लोवर ,स्पायनल कॉडमध्ये कॅन्सर असल्याचे समजले. जेव्हा कॅन्सरवर ऑपरेशन करण्यात आले, तेव्हा त्यांच्या छातीला संपूर्णपणे लकवा मारला. यानंतर आनंद सलग तीन वर्षे पलंगावरच पडून होता. या तीन वर्षादरम्यान त्यांचे केवळ हातच थोडे हालू शकत होते.

कुटुंबाने दिला पाठींबा, दिली हि्म्मत
आनंद सांगतो की, "तीन वर्षांपर्यंत पलंकावर पडून राहिलो असताना, माझ्या कुटुंबाने मला मोठा पाठींबा दिला. त्याकाळात त्यांनी माझ्यासाठी खुप कष्ट घेतले. आणि आज जेव्हा मी बॉडीबिल्डींगमध्ये परतलोय आणि मी मेडल मिलवला तेव्हा माझ्या कुटुंबियांसाठी आणि माझ्यासाठी हा खुपच आनंदाचा क्षण होता. त्यांनी केलेल्या कष्टाचे कुठे तरी फलीत झाले असे वाटते."

12 वेळा मिस्टर पंजाबचा खिताब पटकावला
आनंदने आतापर्यंत तीन वेळा मिस्टर इंडियाच्या खिताबा सोबतच 12 वेळा मिस्टर पंजाबचा खिबात पटकावला आहे. आनंदच्या करिअर ग्राफवर नजर टाकली तर त्यांच्या या लिस्ट मध्ये इतर लहान मोठे 27 खिताबांचाही समावेश होतो. याशिवाय आनंदने 'मुस्कले मेनिया' या इव्हेंटमध्येही सहभाग नोंदवला आहे

पुढील स्लाईडवर पाहा, आनंद अर्नोल्डचे काही निवडक फोटो आणि त्याच्या जीवनाविषयीची माहिती