आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Parents Commit Suicide After 7 Year Old Son Dies Of Dengue In Delhi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलगा डेंग्यूने दगावला; माता-पित्यांची आत्महत्या; रुग्णालयांनी दाखल करून घेतले नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लक्ष्मीचंद व बबिता राऊत आपल्‍या चिमुकल्‍यासह - Divya Marathi
लक्ष्मीचंद व बबिता राऊत आपल्‍या चिमुकल्‍यासह
नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत दोन मोठ्या रुग्णालयांनी दाखल करून न घेतल्यामुळे एका सात वर्षांच्या मुलाचा डेंग्यूने मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूचा जबर मानसिक धक्का बसल्याने आई - वडिलांनीही उंच इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केली. केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनीही पाच रुग्णालयांना नोटीस बजावली आहे.

दक्षिण दिल्लीत लाडो सराय भागात राहणाऱ्या लक्ष्मीचंद व बबिता राऊत या ओडिशातील दांपत्याने चौथ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. त्यांनी लिहिलेल्या सुसाइड नोटमुळे ही घटना उघडकीस आली. त्यांचा मुलगा अविनाशला चार सप्टेंबर रोजी डेंग्यू झाला होता. त्याच्यावर आधी खासगी रुग्णालयात उपचार झाले. तब्येत बिघडल्याने चंद्र मेडिसिटी, मॅक्स साकेत, आकाश, आयरीन रुग्णालयात नेले. परंतु बेड नसल्याचे भर्ती करून घेतले नाही. त्याला नऊ किलोमीटर दूर तुघलकाबादला न्यावे लागले. या धावपळीत आठ सप्टेंबरला त्याचा मृत्यू झाला. त्याच रात्री दांपत्याने एकमेकांना ओढणीने बांधून घेत चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.