आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीच्या मृत्यूनंतरही AIIMSचा डॉक्टर कमलच्या चेहऱ्यावर नव्हती दुःखाची रेष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली /जयपूर - पती समलैंगिक असल्याच्या वास्तवासोबत त्याच्या शारीरिक, मानसिक छळाची बळी ठरलेल्या एस्मच्या डॉ. प्रिया वेदी यांनी मनगटाची नस कापून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी उघड झाली होती. डॉ. प्रियाने दिल्लीतील ज्या  हॉटेलमध्ये जीवनयात्रा संपवली तिथे तिचे नातेवाईक पोहोचण्याआधी तिचा पती डॉ. कमल वेदी पोहोचला होता. प्रियाचे काका डॉ. वेदप्रकाश आणि चुलत भाऊ ऋषभ याने सांगितले, की हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर डॉ. कमलने प्रियाच्या मृतदेहाकडे पाहिले देखील नाही. एवढेच नाही तर त्याच्या चेहऱ्यावर दुःखाचा लवलेषही नव्हता किंवा चिंता दिसत नव्हती. जणू काही त्याला या सगळ्याची आधीच माहिती होती.
 
 
डॉ. कमल वेदीला सोमवारी पोलिसांनी अटक केली आणि कोर्टात हजर केले होते. त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. डॉ. प्रिया एम्समध्ये अनेस्थेशिया विभागात वरिष्ठ निवासी डॉक्टर म्हणून कार्यरत होत्या. तर डॉ. कमल देखील त्याच हॉस्पिटलमध्ये त्वचारोग तज्ज्ञ आहे. दोघेही मुळचे जयपूरचे आहेत.
 
नातेवाईकांवर कोसळला दुःखाचा डोंगर
प्रियाच्या मृत्यूने जयपूरच्या चांदपोल येथे शोककळा पसरली आहे. टेलरिंगचे काम करणारे तिचे वडिल रामबाबू वर्मा आणि त्यांचे कुटुंबिय यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रामबाबू म्हणाले, \'प्रिया पहिल्यापासून सर्व सहन करत आली होती. तिने आम्हाला कधीच काही सांगितले नाही. तिचा छळ होत असल्याचे जेव्हा आम्हाला कळाले तेव्हा तिने आम्हाला शांत राहाण्यास सांगितले.\' प्रियाच्या एका नातेवाईकाने सांगितले, की डॉ. कमल तिला झोपेच्या गोळ्या देत होता. कधी-कधी त्याचा ओव्हर डोस देखील तो देत होता. प्रियाच्या वडिलांनी सांगितले, की तिच्या सासऱ्यांनी आम्हाला आश्वासन दिले होते, लवकरच सगळे ठिक होईल. मात्र ते असे ठिक होईल याची आम्ही कल्पना केली नव्हती.
 
प्रियाचा चूलत भाऊ रजतला शोक अनावर झाला होता. तो रडत रडत सांगत होता, की दीदीने कधीच तिचे दुःख आम्हाला सांगितले नाही. ती एकटीच सहन करत राहिली. फक्त तिचा छळ होत असता तर समजू शकलो असतो, पण पती समलैंगिक आहे, हे देखील तिने लपवून ठेवले. तिने तिला वाचवण्याची आम्हाला संधीच दिली नाही. रजत म्हणाला, \'दीदीचे पती समलैंगिक आहे हे कळाल्यानंतरही ती त्याला स्विकारण्यास तयार होती. मात्र जेव्हा तो तिचा छळ करु लागला तेव्हा तिला हे आयुष्य नकोसे झाले.\' रजत म्हणाला, \'मी दीदीची फेसबुक पोस्ट पाहिल्याबरोबर तिचा फोन केला मात्र, तिने फोन रिसिव्ह केला नाही. तेव्हा फार उशिर झाला होता.\'
 
 
टेलरिंग काम करुन मुलांना शिकवले
प्रियाचे वडील रामबाबू वर्मा यांचे मित्र कल्याण यांनी सांगितले, की रामबाबूंनी मोठ्या कष्टाने मुलांचे शिक्षण केले आणि त्यांना मोठ्या पदावर पोहोचवले. त्यांनी टेलरिंग करुन मुलांचे शिक्षण केले. समाजात त्यांच्याकडे मोठ्या आदराने पाहिले जाते.
 
पुढील स्लाइडमध्ये, मृत्यूआधी डॉ. प्रियाने लिहिलेली पोस्ट आणि शोकाकूल परिवार