आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दगडफेक करणाऱ्यांना कशाला, अरुंधती रॉय यांनाच आर्मी जीपवर बांधा; परेश रावल यांचे ट्वीट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - काश्मिरात जवानांवर दगडफेकीच्या घटनांवरून अभिनेते व भाजप खासदार परेश रावल यांच्या बुकर पुरस्कार विजेत्या लेखिका अरुंधती रॉय यांच्यावरील ट्विटने वाद निर्माण झाला आहे.
 
काही दिवसांपूर्वीच्या एका व्हिडिओत दगडफेकीपासून वाचण्यासाठी लष्करी जवानांनी एका काश्मिरी तरुणाचा मानवी ढाल म्हणून उपयोग करत त्याला जीपला बांधले होते. त्याचा संदर्भ देत रावल म्हणाले, ‘दगडफेक करणाऱ्यांऐवजी लष्कराच्या जीपला अरुंधती यांना बांधले पाहिजे.’ अरुंधती यांच्यावर भारतीय लष्कराविरोधी वक्तव्ये केल्याचा आरोप केला जाताे.
 
काँग्रेस नेते दिग्विजय सिंह म्हणाले...
भाजप खासदार आणि अभिनेते परेश रावल यांच्या ट्वीटवर सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे. यात काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी टीका करताना, भाजप-पीडीपी युती करणाऱ्यांना का जीपवर बांधू नये? असा उपहासात्मक सवाल केला आहे. 
- अभिनेता ते नेते झालेले परेश रावल यांनी रविवारी रात्री ट्वीट केले आहे. यात भाजप खासदार परेश यांनी लिहिले की दगडफेक करणाऱ्यांना आर्मी जीपवर बांधण्याऐवजी अरुंधती रॉय यांना बांधायला हवे.  
- यानंतर कित्येक लोकांनी परेश रावल यांच्या ट्वीटवर अनेक प्रश्न विचारू ट्रोल करण्या प्रयत्न करण्यात आला. यास परेश यांनी उत्तरे सुद्धा दिली. एका ट्वीटचे उत्तर देताना परेश रावल म्हणाले, आमच्याकडे अनेक प्रकारचे आणि बरेच पर्याय उपलब्ध आहेत. 
 
3000 हून अधिक वेळा रिट्वीट
गुजरातमधून भाजपचे खासदार परेश रावल यांचे ट्वीट अवघ्या 14 तासांतच 3 हजार वेळा रिट्वीट करण्यात आले आहे. यासोबतच, 6 हजारांहनू लाईक सुद्धा मिळाले आहेत. 
- रावल यांनी 2014 मध्ये भाजप प्रवेश करून राजकारणात पाऊल ठेवले. 
- काश्मीरात गेल्या महिन्यामध्ये लष्कराने दगडफेक करणाऱ्यांना रोखण्यासाठी आपल्या जीपसमोर बांधले होते. या घटनेचा व्हिडिओ देशभर व्हायरल झाला. काहींनी प्रतिक्रिया देताना लष्कराच्या समर्थनात तर काहींनी यास मानवाधिकार उल्लंघन मानले होते. 
- लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश सुद्धा यापूर्वीच दिले आहेत.
 
पुढील स्लाईडवर वाचा... परेश रावल यांचे ट्वीट, दिग्विजय सिंह यांचे उत्तर...
बातम्या आणखी आहेत...