आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP MPs Paresh Rawal Stirs Controversy; Says Hindu Places Of Worship Among The Dirtiest

हिंदुंच्या धार्मिक स्थळांवर सगळ्यात जास्त अस्वच्छता, परेश रावल यांचे वादग्रस्त वक्तव्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोः स्वच्छता अभियानात सहभागी झालेले भाजपचे खासदार आणि बॉलिवूड अभिनेते परेश रावल)

नवी दिल्ली/ अहमदाबाद- बॉलिवूड अभिनेते आणि भाजपचे नवनिर्वाचित खासदार परेश रावल यांनी वादग्रस्त वक्तव्य करून नवा वाद ओढवून घेतला आहे. हिंदुंच्या धार्मिक स्थळांवर सगळ्यात जास्त अस्वच्छता असल्याचे वक्तव्य परेश रावल यांनी केले आहे. परेश रावल हे अहमदाबाद (पश्चिम) लोकसभा मतदार संघातून निवडून आले आहेत.

अहमदाबाद जवळ असलेल्या वालोल येथील स्वच्छता अभियानात खासदार परेश रावल सहभागी झाले होते. उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना परेश रावल म्हणाले की, अन्य धर्माच्या धार्मिक स्थळांच्या तुलनेत हिंदुंच्या धार्मिक स्थळांवर जास्त अस्वच्छता असते.
परेश रावल हे अहमदाबाद शहाराच्या एक दिवसाच्या दौर्‍यावर आले आहेत. परेश रावल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय मानले जातात.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, परेश रावल यांनी हातात घेतला झाडू...